मुंबई : शेतकरी संघटना आणि केंद्र सरकार यांच्यात झालेल्या बैठकीनंतर केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर म्हणाले की ही बैठक चांगली झाली आणि आम्ही निर्णय घेतला आहे की 3 डिसेंबर रोजी पुन्हा चर्चा होईल. ते पुढे म्हणाले की,' आम्हाला एक छोटा गट स्थापन करायचा होता, पण चर्चा सर्वांसोबत व्हावी अशी शेतकरी नेत्यांची इच्छा होती. आम्हाला यात काहीही अडचण नाही.' केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यासह शेतकरी संघटनांचे नेते या बैठकीस उपस्थित होते.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याचबरोबर पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांचं आंदोलन दिल्लीच्या सीमेवर सुरु आहे. मागील काही दिवसांपासून टीकरी सीमा, सिंघू सीमा व उत्तर प्रदेश येथील गेटवर शेतकरी निदर्शने करीत आहेत. दरम्यान राजवीरसिंग जादौन यांनी 3 डिसेंबर रोजी यूपी गेटवर एक ऐतिहासिक पंचायत करणार असल्याची घोषणा केली आहे.


आंदोलक शेतकर्‍यांशी चर्चेदरम्यान सरकारने म्हटले की, तुम्ही तुमच्या संघटनेतील चार ते पाच जणांची नावे घ्यावीत, ज्यामध्ये सरकारच्या काही प्रतिनिधींचा समावेश असलेली एक समिती तयार केली जाईल. ही समिती काही कृषी तज्ज्ञांशी कायद्याबाबत चर्चा करणार आहे.



दिल्ली यूपी सीमेवरील भारतीय किसान युनियनचे नेते नरेश टिकैत म्हणाले की, सरकारने पंजाबच्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी संध्याकाळी 3 वाजताची वेळ दिली होती. त्यानंतर, सरकार संध्याकाळी 7 वाजता उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा आणि दिल्ली येथील शेतकऱ्यांसोबत बैठक घेईल. आपल्या सर्वांना या विषयावर अंतिम निर्णय हवा आहे.'


दरम्यान कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर आणि रेल्वमंत्री पियुष गोयल हरियाणा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड येथील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. महत्त्वाचं म्हणजे आता 3 डिसेंबरला होणाऱ्या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह आणि कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर उपस्थित राहू शकतात.