कोल्हापूर / मुंबई : रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. त्यांच्यावर दिल्लीतल्या एम्स रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. ११ सप्टेंबरला त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले. त्यांनी स्वत: ट्विट करून त्याची माहिती दिली होती. ते बेळगावचे खासदार होते. दरम्यान, सुरेश अंगडी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करून त्यांच्या कुटुंबीयाबद्दल संवेदना व्यक्त केली आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेल्वे राज्य मंत्री सुरेश आगंडी हे बेळगावचे खासदार होते. बेळगावमधील सदाशिव नगरमध्ये ते राहत होते. १२ दिवसांपासून त्याच्यावर कोरोनाचे उपचार सुरू होते. दोन दिवसांपूर्वी त्यांना जास्त त्रास होत असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले होते. त्यांना पाहिल्यादाच मंत्रीपद मिळालं होते. सुरेश आंगडी यांचा बेळगाव मतदारसंघ होता. ते सलग चारवेळा निवडून आले होते. कन्नडबरोबरच ते मराठी उत्तम बोलायचे.



२००४ लागू पहिल्यांदा लोकसभा लढविली. तेव्हा ते विजयी झालेत. त्यानंतर २००९, २०१४ आणि २०१९ सलग चौथ्यांदा विजयी झाले. २०१९ च्या सरकारमध्ये रेल्वे राज्यमंत्री पद मिळाले. त्यांनी रेल्वे डिजिटलायजेशनवर भर दिला. रेल्वेच्या स्वच्छतेवर विशेष भर दिला.



भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी ट्विट करत अंगडी यांच्या निधनाची माहिती दिली. ११ सप्टेंबर रोजी त्यांनी कोरोना झालेचे सांगितले होते. तसेच याबाबत त्यांनी ट्विट करत जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांची आपली कोरोना चाचणी करावी, असे आवाहनही केले होते.