Indian Station where you need visa: आपल्या सर्वांना फिरायला प्रचंड आवडतं. अनेक दिवस आपण कुठे फिरायला गेलो नाही तर आपल्या मनावर मळभ येते. फिरायला जाण्याने आपलं शरीर आणि मन प्रफुल्लित होतं ( Travel for rejuvination) . फिरायला जाणं हे एक प्रकारचं मेडिटेशन आहे. भारत हा एक असा देश आहे जिथे आपल्याला जगभरातील प्रत्येक ठिकाणाचं वातावरण अनुभवता येतं. आपलं कोकण कॅलिफोर्नियापेक्षा ( Konkan and California)  कमी नाही किंवा कुल्लू मनाली ( Kullu Manali) हे स्विझर्लंड ( switzerland ) इतकंच सुंदर आहे. भारतात दुबईसारखा ( Dubai) थार वाळवंट ( Thar Dessert)  देखील आहे. त्यामुळे भारतात तुम्हाला फिरण्यासाठी प्रचंड वाव आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्याला परदेशात फिरायला जायचं असल्यास आपल्याला व्हिसा ( Indian Visa) काढावा लागतो. अशात आता तुम्हाला आता भारतात फिरण्यासाठीही व्हिसा काढावा लागणार का ( Visa for travel in India) ? हेच या बातमीतून आपण जाणून घेणार आहोत. भारतात फिरायला भारतीयांना कोणत्याही व्हिसाची गरज नाही. मात्र, भारतात एक असं स्टेशन आहे जिथे तुमचा व्हिसा तपासाला जातो. तुमचा पासपोर्टही तपासाला जातो. ही जागा नेमकी कोणती? हे देखील आपण जाणून घेणार आहोत. महत्त्वाचं म्हणजे इथे तुम्ही बिना पासपोर्ट व्हिसा गेलात तर तुम्हाला अटकही होऊ शकते. 


भारतात रेल्वेचं मोठं जाळं आहे ( Indian Railways Network) . तुम्ही काश्मीर ते कन्याकुमारी ( Kashmir To Kanyakumari) आणि अगदी राजस्थानच्या जैसलमेरपासून थेट नागालँड ( Rajasthan to arunachal pradesh) किंवा अरुणाचल प्रदेशच्या झिरोपर्यंत ट्रेनने प्रवास करू शकतात.


या स्टेशनवर प्रत्येक क्षणक्षणाची होते रेकॉर्डिंग  


आपल्या भारतातीलच हे एक असं स्टेशन आहे जिथे CCTV आणि पोलिसांच्या मदतीने क्षणाक्षणावर नजर ठेवली जाते. या स्टेशनवर गुप्तचर यंत्रणांची माणसं देखील तैनात असतात ( Sensetive railway stations of India). व्हिसाशिवाय या रेल्वे स्थानकावर पोहोचल्यास अशा नागरिकांवर फॉरेन ऍक्ट ( Foreign Act) अंतर्गत कारवाईचा सामना करावा लागू शकतो. 


देशातील अत्यंत संवेदनशील स्टेशन म्हणून हे स्टेशन ओळखलं जातं. याच स्टेशनवरून थेट पाकिस्तानात समझौता एक्स्प्रेस ट्रेन्स जायची. महत्त्वाची बाब म्हणजे या स्टेशनवरून रेल्वे तिकीट खरेदी करण्यासाठी तुम्हाला पासपोर्ट दाखवायला लागायचा. जम्मू काश्मीरमधील कमल 370 हटवल्यानानंतर ही ट्रेन अजूनही बंद आहे.


भारतातील या स्टेशनचं नाव आहे अटारी. अटारी ( Atari Railway Station) हे भारतातील पंजाबमधील शेवटचं स्टेशन आहे. एकीकडे पाकिस्तानचा वाघा भाग ( Wagha Border) आणि दुसरीकडे भारतातील अमृतसर आणि यामधील हे स्टेशन असल्याने हे अत्यंत संवेदनशील स्टेशन आहे. 


unique indian railway station where your passport and visa are checked