एका लग्नाची गोष्ट! 65 वर्षाच्या वृद्धाचे 24 वर्षीय तरूणीसोबत लग्न
Marriage Story : सहा मुलींचा बाप असलेला 65 वर्षीय वृद्ध पुन्हा नवरदेव बनला आहे.या नवरदेवाचे नाव नकछेद यादव आहे. या 65 वर्षीय यादवने 24 वर्षाच्या तरूणीशी लग्न केले आहे. या लग्नात त्याचे अनेक नातेवाईक उपस्थित होते.
Marriage Story : देशभरात लग्नाचा (Wedding) माहोल सुरु आहे. अनेक नवीन तरूण-तरूणी या लग्नाच्या मोसमात लग्नबंधनात अडकतायत. तसेच जागोजागी लग्नाचे ढोल-नगाडे, वराती निघतायत. सोशल मीडियावर (Social media)देखील लग्नाचे व्हिडिओ ट्रेंडमध्ये आहेत. असे सर्व असताना एका अनोख्या लग्नाची गोष्ट समोर आली आहे. या घटनेत एका 65 वर्षीय वृद्धाने 24 वर्षीय तरूणीसोबत लग्न केल्याची घटना घडली आहे. या अनोख्या लग्नाची गावासह सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
सहा मुलींचा बाप बनला पुन्हा नवरदेव
सहा मुलींचा बाप असलेला 65 वर्षीय वृद्ध पुन्हा नवरदेव बनला आहे.या नवरदेवाचे नाव नकछेद यादव आहे. या 65 वर्षीय यादवने 24 वर्षाच्या तरूणीशी लग्न केले आहे. या लग्नात त्याचे अनेक नातेवाईक उपस्थित होते. विशेष म्हणजे या लग्नात यादव यांनी तुफान डान्स (Dance) देखील केला आहे. या त्याच्या डान्सची लग्नात एकच चर्चा रंगली होती.
41 वर्षाने लहान तरूणीसोबत लग्न
हुसैनपूर गावात राहणाऱ्या नकछेद यादवने आपल्या पेक्षा वयाने 41 वर्षाने लहान असणाऱ्या तरूणीसोबत थाटामाटात लग्न केले आहे. या लग्नात 6 मुलींचे जावई आणि नातवंडे उपस्थित होते. या लग्नाच्या वरातील नवरदेव नकछेद यादवने तुफान डान्स केला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Social media) होत आहे. रविवारी पार पडलेला हा लग्न सोहळा संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.
हिंदू रितीरिवाजानुसार लग्न
नकछेद यादवने मुलीच्या वयाच्या तरूणीसोबत लग्न केले आहे.या तरूणीचे नाव नंदनी आहे. रुदौली परिसरातील कामाख्या देवी मंदिरात त्यांनी हिंदू रितीरिवाजांनुसार (hindu rituals) दुसरे लग्न केले आहे. या लग्नात जवळपास 50 नातेवाईक सहभागी झाले होते.
नकछेद यादव हे आपल्या पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर एकाकी पडले होते. त्यामुळे घरच्यांच्या संमतीने त्यांनी दुसरे लग्न (Second marriage) करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार त्यांनी दुसरी पत्नी नंदनी हिच्याशी लग्न केले. हे लग्न करून त्यांना खूप आनंद झाला आहे. त्यांची सर्व मुले विवाहित असून हा विवाह संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे.
दरम्यान उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बाराबंकी येथे हि अनोख्या लग्नाची घटना घडली आहे. या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा आहे.