नवी दिल्ली : रोषणाईचा सण दिवाळी आता फक्त भारतातच नाही तर जगभरात देखील साजरा होतो. जीवनातला अंधार दूर करुन पुढे जाण्यासाठी प्रेरणा देणारा सण संयुक्त राष्ट्राने देखील एका वेगळ्या अंदाजात साजरा केला. संयुक्त राष्ट्राने दिवाळीच्या निमित्ताने एक पोस्ट स्टॅम्प जारी केला आहे. भारताने यामुळे बुधवारी संयुक्त राष्ट्र डाक प्रशासनाने आभार देखील मानले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संयुक्त राष्ट्र डाक प्रशासनाने दिवाळी उत्सव साजरा करण्यासाठी 19 ऑक्टोबरला एक विशेष कार्यक्रम पत्र जारी केलं आहे. संयुक्त राष्ट्रामध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी असलेले सैयद अकबरुद्दीन यांनी ट्विट करत म्हटलं की, 'चांगले आणि वाईट यांच्यात रोज संघर्ष सुरु असतो. रोषणाईच्या पवित्र सणाच्या दिवशी दिवाळीच्या पहिल्या डाक स्टॅम्पच्या निमित्ताने वाईटवर चांगल्याचा विजय ही आमची प्रार्थना दर्शवल्याने युएन स्टॅम्पचे धन्यवाद'


1.15 डॉलर मुल्य असलेल्या या शीटमध्ये 10 डाक नाव पत्र जारी करण्यात आले आहेत. ज्यामध्ये रोषणाई आणि दिवे दर्शवण्यात आले आहेत. या कागदाच्या मागच्या बाजुला संयुक्त राष्ट्र मुख्यालयाची रोषणाई केलेली इमारत आणि सणाचा भाव दाखवण्यासाठी शुभ दीपावली असा संदेश दाखवण्यात आला आहे.