लखनऊ : उन्नाव गँगरेप प्रकरणात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एसआयटीला ताबडतोब रिपोर्ट देण्यास सांगितले आहे. मात्र या प्रकरणात आता पीडित मुलीच्या वडिलांचा पोलीस स्टेशनमध्ये झालेला संसयास्पद मृत्यू आता नवा खुलासा करत आहे. झी मीडियाला मिळालेल्या 3 एप्रिलचा एक व्हिडिओमध्ये यूपी पोलीस जखमी अवस्थेतील बेशुद्ध पीडितेच्या वडिलांचा अंगठा काही कागदपत्रांवर लावून घेत आहेत. या व्हिडीओत दावा केला जात आहे की, हा व्हिडीओ भाजपा आमदार कुलदीप सिंह सेंगर यांच्यावर ज्या तरुणीने बलात्काराचा आरोप केला आहे तिच्या वडिलांचा आहे. या व्हिडीओची सत्यता पडताळली जात आहे. 


व्हिडिओत नेमकं काय? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडीओत दिसत असलेली व्यक्ती पीडित तरुणीचे वडिल असल्याचं सांगितलं जात असून, ते स्ट्रेचरवर बेशुद्ध अवस्थेत पडलेले दिसत आहेत. तीन लोक त्याच्याजवळ उभे असलेले दिसत आहे. यापैकी एक पोलीस आहे. व्हिडीओत दिसत असल्याप्रमाणे, त्या व्यक्तीच्या पायातून रक्त निघत असून तो बेशुद्ध अवस्थेत पडला आहे. यावेळी त्याची मदत करायचं सोडून जवळ उभे असणारे दोघेजण कागदावर त्याचा अंगठा घेत आहेत. हे सर्व खूप घाईत केलं जात असल्याचंही दिसत आहे. हा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 


काय आहे प्रकरण ?


या अगोदर याच प्रकरणातील आणखी एक व्हिडिओ आता समोर आल होता. या व्हिडिओत पीडितेचे वडील गंभीर जखमी अवस्थेत दिसत होते. हा व्हिडिओ ३ एप्रिल रोजीचा असल्याचं सांगण्यात येत आहे. हा व्हिडिओ एका रुग्णालयातील आहे. यात पीडितेच्या वडिलांसोबत दोन पोलीसही दिसत आहे. .या संदर्भातील आणखी बातमी : व्हिडिओ : बलात्कार पीडितेच्या वडिलांना मृत्यूपूर्वी अशी झाली होती मारहाण


 


या व्हिडिओत पीडितेच्या वडिलांच्या अंगभर दिसणाऱ्या जखमा त्यांना किती क्रूर मारहाण करण्यात आली, याची जणू साक्षच देत आहेत. व्हिडिओत त्यांच्या हातावर, पायावर, चेहऱ्यावर, पाठीवर अतिशय क्रूररितीन मारहाण करण्यात आल्याच्या खूणा दिसत आहेत. या जखमांतून रक्त वाहतंय आणि बाजुला उभे असलेले पोलीस मात्र हसताना दिसत आहेत. या जखमा इतक्या भयंकर आहेत, की हा व्हिडिओ आम्ही स्पष्टपणे दाखवू शकत नाहीत.