उन्नाव बलात्कार पीडितेचा सफदरजंग रूग्णालयात मृत्यू
`मी वाचेल का?`, बलात्कार पीडितेचा डॉक्टरांना प्रश्न.
नवी दिल्ली : उन्नाव येथील बलात्कारपीडितेचा शुक्रवारी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात मृत्यू झाला. त्याआधी पीडितेने डॉक्टरांना मी वाचेल का? असा प्रश्न विचारला होता. परंतु हा प्रश्न तिचा शेवटचा प्रश्न होता. कारण त्यानंतर अवघ्या काही मिनीटांतच तिने शुक्रवारी रात्री ११. ४० च्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. बलात्कारपीडित महिलेला गुरुवारी पहाटे आरोपींनी जाळण्याचा प्रयत्न केला होता.
त्यात ती ९० टक्क्य़ांहून अधिक भाजल्यानंतर तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पीडित महिलेला कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आले होते. गेल्या वर्षी तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. तिच्यावर बलात्कार करणाऱ्या दोन आरोपींपैकी एकाला दहा दिवसांपूर्वी जामीन मिळाला होता, तर दुसरा आरोपी फरार आहे.
गुरुवारी सकाळी पाच जणांनी तिच्यावर हल्ला करून तिला पेटवून दिले होते. त्याचप्रमाणे आरोपी तिच्या कुटुंबाला वारंवार धमकावत असल्याचे देखील समोर येत आहे.