उत्तरप्रदेश आणि बिहारमधील लोकसभा पोटनिवडणुकीची आज मतमोजणी
उत्तरप्रदेशातील गोरखपूर, फुलपूर आणि बिहारमधील अररिया लोकसभा पोटनिवडणुकीची आज मतमोजणी आहे.
नवी दिल्ली : उत्तरप्रदेशातील गोरखपूर, फुलपूर आणि बिहारमधील अररिया लोकसभा पोटनिवडणुकीची आज मतमोजणी आहे.
गोरखपूर आणि फुलपूर या दोन्ही जागा भाजपासाठी महत्त्वाच्या आहेत. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याने गोरखपूर येथील जागा रिकामी झालीय. तर उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याने फुलपूरची जागा रिकामी झालीय.
गोरखपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपने उपेंद्र दत्त शुक्ला आणि फुलपूमधून कौशलेंद्र पटेल यांना उमेदवारी दिली आहे. गोरखपूर आणि फुलपूरमध्ये बहुजन समाज पक्षाने समाजवादी पक्षाच्या उमेदवारा पाठिंबा दिला असून काँग्रेस स्वबळावर लढलीय. मात्र मतदान कमी प्रमाणात झाल्याने राजकीय पक्षांची पुरती झोप उडालीय.
उत्तरप्रदेशच्या गोरखपूर आणि फुलपूर या लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. या पोटनिवडणुकीक़डे 2019 चा ट्रेलर म्हणून पाहिलं जातंय.