Ashish Dixit : अंधश्रद्धा आणि त्यातून घडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहेत. गुप्तधन, दीर्घायुष्य मिळवण्यासह अन्य कारणांसाठी नरबळी देण्यासारखे प्रकार सुरु आहेत. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्येही (Prayagraj) असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. राष्ट्रीय जन अधिकार शक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आशीष दीक्षित यांची अंधश्रद्धेतून प्रयागराजमध्ये हत्या करण्यात आलीय. त्यांच्याच शिष्याने हा सर्व प्रकार केल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी नितीन सैनी या दीक्षित याच्या शिष्याला हरिद्वार (Haridwar) येथून अटक केली आहे. 10 डिसेंबर रोजी पोलिसांना महामार्गावर आशीष दीक्षितचा मृतहेद आढळला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास करण्यास सुरुवात केली आणि आरोपीला अटक केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दैवी शक्ती मिळण्यासाठी गुरुची हत्या 


दैवी शक्ती मिळण्यासाठी गुरुची हत्या केल्याची कबुली सैनी याने दिली आहे. आशीषनेच नितीनला माझा गळा कापला तर तुझे जीवन बदलेल असे सांगितले होते. त्यानंतर सैनीने दीक्षित याचा गळा चिरला. आशीषने सैनीला बलिदान देण्यासाठी बर्बरीकची मान कापल्याचा व्हिडिओही दाखवला होता. बर्बरीक हे महाभारतातील एक पात्र होते. बर्बरिकने पांडवांच्या विजयासाठी स्वेच्छेने आपले शीर दान केले.


भुलथापांना बळी पडून नितीनने सोडली नोकरी


पोलिस उपायुक्त सौरभ दीक्षित यांनी सांगितले की, "आशीषने अनेकांकडून 25 लाखांपेक्षाही अधिकचे कर्ज घेतले होते. लोकांनी पैसे मागायला सुरुवात केली तेव्हा तो गायब झाला. त्याच्या कुटुंबियांनी आशीष गायब झाल्याची तक्रार दिली. त्यानंतर आशिषने हरिद्वार गाठले आणि साधू बनून राहायला लागला. त्यानंतर सहा महिन्यांनी त्याची नितीन सैनीसोबत त्याची ओखळ झाली आणि आशिषने त्याला शिष्य बनवले. त्याने नितीनच्या घरी पूजा वगैरे सुद्धा केल्या. आशीषने नितीशला सांगितले की, मी दैवी शक्तीने तुझ्या घराची परिस्थिती सुधारेल. त्यानंतर आशिष आणि नितीश हरिद्वारमध्ये स्वतंत्र खोली घेऊन राहू लागले. आशिषच्या भुलथापांना बळी पडून नितीनने खासगी नोकरीही सोडली होती."


दैवी शक्ती मिळविण्यासाठी आपल्या गुरूचा त्याग 


काही दिवसांपूर्वी आशीष नितीनला घेऊन हरिद्वारला आला. एका हॉटेलमध्ये दोघेही एकत्र थांबले. रोज सकाळी गंगेत अंघोळ केल्यानंतर ते पूजा करत होते. यावेळी आशीष नितीनचा सर्व खर्च करत होता. पैसे संपले म्हणून आशीषने त्याचा मोबाईल विकून टाकला. यावेळी आशीषने नितीनला सांगितले जर तू माझा बळी दिलास तर दैवी शक्ती प्राप्त झाल्यानंतर मी परत जिवंत होईल. पूर्वीही मी दैवी शक्ती मिळविण्यासाठी आपल्या गुरूचा त्याग केला होता, असेही आशीषने सांगितले. 


शीर वेगळे केल्यानंतर कपाळावार माझे रक्त लाव 


8 डिसेंबर रोजी दोघेही विंध्याचल येथे विंध्यवासिनी देवीच्या दर्शनासाठी गेले होते. त्यानंतर आशीषने नितीनला त्याची हत्या करण्यास सांगितले. यानंतर मला दैवी शक्ती प्राप्त होईल आणि मी तुझे आयुष्य बदलून टाकेन असेही त्याने नितीनला सांगितले. पूजनेंतर आशीषने काही गोळ्या खाल्ल्या आणि मी निद्रावस्थेत जात असल्याचे सांगितले. निद्रावस्थेतून न उठल्यास आणि शरिरातून काही हालचाल न झाल्यास माझे शीर धडावेगळे कर असे आशिषने सांगितले. शीर वेगळे केल्यानंतर त्याच्या कपाळावार माझे रक्त लाव आणि त्याला अभिषेक घाल असेही आशीषने सांगितले. यानंतर नितीनने त्याचा गळा चिरला आणि पूजा केली.


पुन्हा हरिद्वारला भेटेन


शीर धडापासून वेगळे करण्याआधी आशीषने पूजेनंतर मी तुला कामाख्या देवीच्या दर्शनानंतर हरिद्वारला भेटेन असे नितीनला सांगितले होते. त्याप्रमाणे नितीनहे हत्या केल्यानंतर हरिद्वार गाठले. मात्र पोलिसांनी पाळत ठेवून हरिद्वारमध्ये छापा टाकून नितीशला अटक केली.