नवी दिल्ली : राम मंदिर ट्रस्टची पंतप्रधान मोदी यांच्याकडून घोषणा होताच आता योगी कॅबिनेटने देखील सुन्नी वक्फ बोर्डाला जमीन देण्याचा प्रस्ताव पास केला आहे. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार अयोध्येतील धन्नीपूर गावात सुन्नी वक्फ बोर्डाला जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारचे प्रवक्ते सिद्धार्थनाथ सिंह यांनी म्हटलं की, 'आज ५ एकर जमीन देण्याचा प्रस्ताव पास झाला आहे. आम्ही ३ पर्याय पाठवले होते. ज्यामद्ये या जागेवर सहमती झाली आहे. मशिदीसाठी धन्नीपूरमध्ये जमीन दिली जाणार आहे. ही मुख्यालयापासून १८ किलोमीटरवर आहे.'


केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी झालेल्या बैठकीत 'श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र' ट्रस्ट बवण्यासाठी मंजुरी दिली आहे. हा ट्रस्ट अयोध्येत राम मंदिराची निर्मिती आणि या संबंधित निर्णय घेण्यासाठी बनवण्यात येणार आहे.'



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी लोकसभेत याची घोषणा केली. सरकारने अयोध्या कायद्याच्या अंतर्गत अधिग्रहण केलेली 67.70 एकर जागा ही राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राला देणार असल्याचं देखील पंतप्रधानांनी म्हटलं आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं की, 'श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र' ट्रस्टमध्ये 15 ट्रस्टी असतील. ज्यापैकी एक दलित समाजातून असतील.


सुन्नी वक्फ बोर्डाला 5 एकर जमीन देण्यासाठी सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं. मोदी सरकारने यूपी सरकारला याबाबत आग्रह केला होता. त्यानंतर आता राज्य सरकारने देखील जमीन देण्याचा निर्णय घेतला आहे.