चुकीला माफी नाही! Yogi Adityanath यांनी DSP ची केली थेट शिपाई म्हणून नियुक्ती!
भ्रष्टाचार करणाऱ्या आरोपींना मुख्यमंत्री योगी आदित्यानाथांनी पळता भुई थोडी केली आहे
उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी भ्रष्टाचाराबाबत (corruption) कडक धोरण स्वीकारले आहे. एका प्रकरणात लाच (Bribe) घेणाऱ्या पोलीस (Police) अधिकाऱ्याला थेट हवालदार (constable) बनवण्याचे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लाच (Bribe) घेतल्याच्या आरोपावरून रामपूर नगरचे तत्कालीन कार्यक्षेत्र अधिकारी पोलीस उपअधीक्षक (DSP) विद्या किशोर शर्मा यांची थेट हवालदारपदी (constable) नेमणूक करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर सर्वच आश्चर्यचकित झाले आहेत. योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचा आक्रमकपणा पाहून भ्रष्टाचाऱ्यांची (corruption) पळता भूई थोडी होण्याची शक्यता आहे. (UP CM Yogi Adityanath made Deputy SP to police constable trapped in corruption)
विद्या किशोर शर्मा यांची 2021 मध्ये रामपूर येथे नियुक्ती करण्यात आली होती. रामपूर येथे लाचखोरी प्रकरणात प्रशासकीय कारणास्तव विद्या शर्मा यांची बदली करण्यात आली आणि चौकशी सुरू करण्यात आली होती. चौकशीत विद्या किशोर शर्मा दोषी आढळून आल्या. त्यानंतर कठोर कारवाई करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विद्या किशोर शर्मांना थेट शिपाई बनवण्याचे आदेश दिले आहेत.
गृह विभागाने ट्विट करून ही माहिती दिली आहे. रामपूर सदरचे तत्कालीन मंडळ अधिकारी असलेले विद्या किशोर शर्मा यांना लाच घेतल्याच्या आरोपावरून त्यांच्या मूळ पदावर त्यांना परत पाठवण्यात आले आहे. पोलीस उपअधीक्षक विद्या किशोर शर्मा यांच्यावर रामपूरमध्ये लाच घेतल्याचा आरोप होता. चौकशीअंती आरोपात तथ्य आढळल्याने कारवाई करण्यात आली आहे. विद्या किशोर शर्मा यांची उत्तर प्रदेश पोलिसात कॉन्स्टेबल म्हणून नियुक्ती झाली होती. बढती मिळाल्यानंतर त्या पोलीस उपअधीक्षक म्हणून रुजू झाल्या.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
2021 मध्ये रामपूरमध्ये विद्या किशोर शर्मा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. स्वामी विवेकानंद रुग्णालयाचे संचालक विनोद यादव आणि तत्कालीन निरीक्षक रामवीर यादव यांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप एका महिलेने केला होता, ज्यात पोलिसांनी कारवाई केली नाही. याप्रकरणी विद्या किशोर यांनी पाच लाखांची लाच घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
यानंतर आरोपी पोलीस निरीक्षक रामवीर यादव आणि हॉस्पिटल ऑपरेटर विनोद यादव यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आणि तत्कालीन सर्कल ऑफिसरला निलंबित करण्यात आले. यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानुसार सरकारने मुरादाबाद येथील वरिष्ठ पोलीस अधीक्षक यांच्याकडून या प्रकरणाची चौकशी केली. तपासात भ्रष्टाचाराचे आरोप खरे असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर कडक कारवाई करत मुख्यमंत्री योगींनी पोलीस उपअधीक्षक विद्या किशोर शर्मांना पुन्हा शिपाई बनवण्याचे निर्देश दिले आहेत.