5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार, 6 वर्षाच्या मुलासह 3 अल्पवयीन मुलांनी केलं कृत्य
UP Crime: घरमालकाच्या पाच वर्षाच्या मुलीवर भाडेकरुच्या 3 मुलांनी बलात्कार केलाय.
UP Crime: उत्तर प्रदेश राज्याच्या कानाकोपऱ्यातून गुन्हेगारी विश्वातील अनेक घटना समोर येत असतात. अनेक गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या गुन्हेगारांना कायद्याचा धाक नसतो.त्यामुळे ते खून, दरोडा, बलात्कार अशा घटना सर्रास करतात. पण उत्तर प्रदेशमध्ये नुकत्याच समोर आलेल्या घटनेमुळे पालकांच्या पायाखालची वाळू सरकू शकते. आपण विचारही करु शकत नाही, इतक्या लहान मुलांनी हे कृत्य केलंय. अवघ्या 5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झालाय. कशी घडली ही घटना? सविस्तर जाणून घेऊया.
उत्तर प्रदेशच्या बलिया येथून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. येथे घरमालकाच्या पाच वर्षाच्या मुलीवर भाडेकरुच्या मुलांनी बलात्कार केलाय. समोर आलेल्या माहितीनुसार, ही घटना बलिया ठाणे पोलीस क्षेत्रात घडली. पाच वर्षाच्या मुलीला 3 मुलांनी आपल्या वासनेचे शिकार बनवले. पीडित मुलीच्या आईने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. माझ्या मुलीला भाडेकरुंच्या मुलांनी छतावर नेले. ती 3 मुलांसोबत खेळत होती. तेव्हा तिघांनी मिळून मुलीवर बलात्कार केल्याचे पीडितेच्या आईने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
पोलिसांनी दाखल केली तक्रार
पीडित मुलीच्या आईने याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस आपला तपास करत आहेत. भाडेकरुंना 3 मुलगे असून त्यातील एक 6 वर्षांचा, दुसरा 13 वर्षांचा तर तिसरा 16 वर्षांचा आहे. या तिघांनी पाच वर्षाच्या लेकीवर बलात्कार केल्याचे पीडित मुलीच्या आईने पोलिसांना सांगितले. कथितरित्या पोलिसांनी 3 मुलांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना ताब्यात घेतले आहे. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता आणि लैंगिक शोषणाविरोधात मुलांचे सरंक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. कोतवाली प्रभारी बहादूर सिंह यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
आणखी एक परिवार अंधश्रद्धेचा बळी, काय आहे प्रकरण?
छत्तीसगढ येते एकाच परिवारातील 6 ते 7 जणं काहीही न खाता-पिता जप करत होते. याची माहिती पोलिसांन मिळाली. पोलीस घटनास्थळी गेले आणि समोरचा प्रसंग पाहून त्यांनाही धक्का बसला. घटनास्थळी संपूर्ण कुटुंब आजारी पडले होते. यांच्यासोबत काहीतरी वाईट घडल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी घरातील सर्व सदस्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवले. येथे पोहोचल्यावर डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. तर दोघेजण बेशुद्ध पडले होते. एवढेच नव्हे तर कुटुंबातील आणखी दोघांची मानसिक स्थिती बिघडली होती. बेशुद्ध पडलेल्या दोघांना शुद्धीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. छत्तीसगढच्या सक्ती जिल्ह्यातील तांदुलडीह गावात हा प्रकार समोर आला. संपूर्ण एक आठवडा हा परिवार गावात कोणाच्याच नजरेसपडला नाही. यानंतर गाववाल्यांनी याची तक्रार पोलिसांत केली. तांदुलडीह गावामध्ये दोन भावांच्या मृत्यूने संपूर्ण गावात घबराहट पसरली आहे. पोलिसांसह गावकरी घरात शिरले तेव्हा त्यांना एकएका गोष्टीचा उलगडा होत गेला. पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत दोन युवकांचा मृत्यू झाला होता. हे दोघे सख्ये भाऊ होते. याच परिवारातील दोघेजण शुद्धीवर नव्हते. त्यांची दयनीय अवस्था झाली होती. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मानसिक स्थिती ठीक नसलेल्या दोघांवर उपचार सुरु आहेत.