आणखी एक परिवार अंधश्रद्धेचा बळी! दोघांचा मृत्यू, 2 बेशुद्ध आणि दोघे झाले वेडे; काय आहे प्रकरण?

Chhattisgarh crime:  कधीकाळी सुखी  म्हणवणारा परिवार अंधश्रद्धेला बळी पडला आहे. काय आहे हे प्रकरण? सविस्तर जाणून घेऊया. 

प्रविण दाभोळकर | Updated: Oct 19, 2024, 01:58 PM IST
आणखी एक परिवार अंधश्रद्धेचा बळी! दोघांचा मृत्यू, 2 बेशुद्ध आणि दोघे झाले वेडे; काय आहे प्रकरण?
अंधश्रद्धेचा बळी

Chhattisgarh crime: भुताटकी, भानामती, देवदेवस्कीला घाबरुन बाबा-बुवांच्या नादाला लागून आख्खच्या आख्खं कुटुंब संपल्याच्या घटना आपण ऐकल्या असतील. पण अजूनही बरेचजण यातून काही बोध घेताना दिसत नाहीत. त्यामुळे अंधश्रद्धेमुळे बळी जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यात आता आणखी एका परिवाराची भर पडली आहे. छत्तीसगडमधून हे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे राहणारा कधीकाळी सुखी  म्हणवणारा परिवार अंधश्रद्धेला बळी पडला आहे. काय आहे हे प्रकरण? सविस्तर जाणून घेऊया. 

Add Zee News as a Preferred Source

छत्तीसगड येते एकाच परिवारातील 6 ते 7 जणं काहीही न खाता-पिता जप करत होते. याची माहिती पोलिसांन मिळाली. पोलीस घटनास्थळी गेले आणि समोरचा प्रसंग पाहून त्यांनाही धक्का बसला. घटनास्थळी संपूर्ण कुटुंब आजारी पडले होते. यांच्यासोबत काहीतरी वाईट घडल्याचा संशय पोलिसांना आला. 

उध्वस्त झाला परिवार 

पोलिसांनी घरातील सर्व सदस्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवले. येथे पोहोचल्यावर डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. तर दोघेजण बेशुद्ध पडले होते. एवढेच नव्हे तर कुटुंबातील आणखी दोघांची मानसिक स्थिती बिघडली होती. बेशुद्ध पडलेल्या दोघांना शुद्धीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. छत्तीसगढच्या सक्ती जिल्ह्यातील तांदुलडीह गावात हा प्रकार समोर आला. संपूर्ण एक आठवडा हा परिवार गावात कोणाच्याच नजरेसपडला नाही. यानंतर गाववाल्यांनी याची तक्रार पोलिसांत केली. 

7 दिवस बाबाच्या नावाचा जाप 

तांदुलडीह गावामध्ये दोन भावांच्या मृत्यूने संपूर्ण गावात भीती पसरली आहे. पोलिसांसह गावकरी घरात शिरले तेव्हा त्यांना एकएका गोष्टीचा उलगडा होत गेला. पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत दोन युवकांचा मृत्यू झाला होता. हे दोघे सख्ये भाऊ होते. याच परिवारातील दोघेजण शुद्धीवर नव्हते. त्यांची दयनीय अवस्था झाली होती. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मानसिक स्थिती ठीक नसलेल्या दोघांवर उपचार सुरु आहेत.

About the Author

Pravin Dabholkar

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."

...Read More