Crime News : नोएडामध्ये (Noida) एका 23 वर्षीय डिलिव्हरी बॉयला उत्तर प्रदेश पोलिसांनी (UP Police) एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक केली आहे. ग्रेटर नोएडा येथील एका अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या एका महिलेने मोबाईल अॅपवरून किराणा सामानाची ऑर्डर दिली होती. सुमित सिंग नावाच्या डिलिव्हरी बॉयला (delivery boy) ही ऑर्डर देण्यासाठी पाठवण्यात आले होते. किराणा सामान देण्यासाठी महिलेच्या पोहोचला तेव्हा ती घरी एकटी असल्याचे त्याच्या लक्षात आले. यानंतर त्याने घरात घुसून मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आणि घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी आता आरोपीला अटक केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ग्रेटर नोएडामध्ये पोलिसांनी या डिलिव्हरी बॉयच्या पायात गोळी झाडली. 27 ऑक्टोबर रोजी डिलिव्हरी बॉय एका सोसायटीत अंडी आणि ब्रेड देण्यासाठी गेला होता. तेथे फ्लॅटमध्ये मुलीला एकटे पाहून त्याने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न सुरू केला. याला तरुणीने विरोध केला असता त्याने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. मुलीने अलार्म वाजवताच आरोपी फ्लॅटमधून पळून गेला. या घटनेबाबत पीडितेने तक्रार दिली होती.  मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी अनेक पथके तयार केली होती. त्यानंतर आता पोलिसांनी ग्रेटर नोएडा येथून पकडले आहे. 


नेमकं प्रकरण काय?


शुक्रवारी ग्रेटर नोएडा येथील एका सोसायटीत राहणाऱ्या एका मुलीने अंडी आणि ब्रेडची ऑनलाइन ऑर्डर दिली होती. डिलिव्हरी बॉय सुमित फ्लॅटवर पोहोचला तेव्हा मुलगी एकटीच होती. पीडितेने पोलिस तक्रारीत सांगितले की, एकटं पाहून आरोपीने तिच्यावर जबरदस्ती करण्यास सुरुवात केली. याला तरुणीने विरोध केला असता आरोपीने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. आरडाओरडा केल्यानंतर आरोपीने तेथून पळ काढला. त्याच दिवशी पीडितेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी एक टीम तयार केली आणि रविवारी ग्रेटर नोएडा येथून आरोपीला पकडले.


रविवारी आरोपी ग्रेटर नोएडातील एका निवासी भागात सापडला. त्याला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असता, तो हवालदार भरत सिंगचे अधिकृत पिस्तूल हिसकावून पळून जाण्यात यशस्वी झाला. त्यानंतर बिसरख पोलीस आणि स्वॅट टीम यांच्या संयुक्त प्रयत्नाने सेक्टर 03 आणि परिसरात आरोपीचा तात्काळ शोध घेण्यात आला. यावेळी पोलिसांचे पथक त्याच्याजवळ गेले असता त्याने गोळीबार केला. पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी प्रत्युत्तरात गोळीबार केला. या गोळीबारात त्याच्या पायाला गोळी लागली आहे. पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.