Girl gang raped: शहरासह गाव खेड्यांमध्ये सामूहिक बलात्काराच्या घटना वाढीस लागल्या आहेत. अशावेळी या नराधमांना समाजाचा, कायद्याचा धाक राहिला नसेल का? असा प्रश्न उपस्थित होतो. उत्तर प्रदेशच्या ओराईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ओराईच्या काल्पी शहरातील एका मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. ही घटना समोर आल्यानंतर संपूर्ण शहर हादरले आहे. हे नराधम एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी पीडित तरुणीचा अश्लिल व्हिडीओदेखील व्हायरल केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोतवाली पोलीस क्षेत्रातून हा प्रकार समोर आला. पीडितेच्या भावाने पोलिसांना याबद्दल सविस्तर माहिती दिली. पाच दिवसांपूर्वी माझी बहीण घरात एकटी होती. तेवढ्यात अचानक चंदा वाल्मिकी, अर्जुन, विक्रम आणि दौलत हे अचानक घरात घुसले. यानंतर त्यांनी बहिणीवर बलात्कार केल्याची माहिती पीडितेच्या भावाने दिली. तसेच बहिणीचा व्हिडीओ व्हायरल केल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले. 


व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. यातील दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.  तर इतरांना पकडण्यासाठी पथक गावात छापे टाकत आहे. 


कोणाला सांगितल्यास मारुन टाकू 


नराधमांनी बलात्कार केल्यावर पीडितेचा अश्लील व्हिडीओ तयार केला. तसेच घडलेल्या प्रकाराबद्दल कोणाला सांगितल्यास मारुन टाकू अशी धमकी पीडितेला दिली. ते एवढ्यावरच थांबले नसून त्यांनी व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल देखील केला. 


लोकांनी पीडितेच्या भावाला या व्हायरल व्हिडीओबद्दल विचारले. याबद्दल ऐकताच सुरुवातीला त्याच्या पायाखालची जमिनच सरकली. त्यानंतर त्याने स्वत:ला सावरले. बहिणीकडे घटनेची चौकशी केली. बहिणीने घडलेली घटना भावाला सांगितली. नराधमांनी धमकी दिल्याने आपण याबद्दल काही सांगितले नसल्याचे तिने आपल्या भावाला सांगितले. 


चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल


पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे तर दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपींना पकडण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत. या प्रकरणाचा तपास सुरु असून लवकरच सर्व आरोपींना पकडण्यात येईल,अशी माहिती पोलिसांनी दिली.