UP Crime : उत्तर प्रदेशच्या (UP News) कानपूरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उपचारासाठी येणाऱ्या एका महिला रुग्णावर डॉक्टरनेच अत्याचार केल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. कानपूरच्या हालत हॉस्पिटलचे वरिष्ठ डॉक्टर प्रेम सिंह यांच्याकडे स्तनाच्या गाठीवर उपचार करण्यासाठी येणाऱ्या महिलेसोबत हा सगळा प्रकार घडला आहे. तपासणीसाठी येणाऱ्या महिलेचा व्हिडीओसुद्धा डॉक्टरने शूट केल्याचे समोर आले आहे. त्याचद्वारे डॉक्टरने ब्लॅकमेल (Blackmail) करत वारंवार बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी (UP Police) डॉक्टरवर गुन्हा नोंदवत याप्रकरणी कारवाई सुरू आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक वर्षे सुरु होते अत्याचार


कानपूरच्या हालत वैद्यकीय महाविद्यालयाचे वरिष्ठ डॉक्टर प्रेम सिंह यांच्यावर उपचारासाठी येणाऱ्या महिलेवर बलात्काराचा आरोप केल्याचा आरोप केल्याने एकच खळबळ उडाली आहे. स्तनातील गाठीवर उपचार घेण्यासाठी आलेल्या महिलेचा आरोपी डॉक्टरने उपचाराच्या बहाण्याने अश्लील व्हिडिओ शूट करत त्यानंतर तिला ब्लॅकमेल करून वर्षानुवर्षे तिच्यावर बलात्कार केला. पीडितेच्या तक्रारीवरून पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार आरोपी डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तक्रार दाखल होताच तात्काळ तपास सुरु केला आहे.


डॉक्टरला मानायची देवाचे रुप


पीडित महिला या डॉक्टरांना देवाचे रुप मानायची. तिला स्तनाच्या गाठीची समस्या होती. याच उपचारासाठी महिला डॉक्टरांकडे गेली होती. टॉर्चच्या सहाय्याने तपासण्याच्या बहाण्याने डॉक्टर प्रेम सिंह यांनी महिलेचा व्हिडिओ बनवला. व्हिडिओ बनवल्यानंतर तो महिलेला सतत ब्लॅकमेल करून तिच्यावर बलात्कार करत होता.  महिलेने असाही आरोप केला आहे की डॉक्टर प्रेम सिंह यांची बदली झाली होती पण तरीही तो तिला ब्लॅकमेल करत राहिला आणि कानपूरला आल्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. आता पीडितेने आरोपी डॉक्टरविरोधात तक्रार दाखल केली आहे.


पीडितेच्या म्हणण्यानुसार, 2018 साली ती कानपूर मेडिकल कॉलेजशी संबंधित हालत हॉस्पिटलमध्ये स्तनातील गाठीच्या उपचारासाठी गेली होती. त्यावेळी डॉ.प्रेम सिंह त्यांच्यावर उपचार करत होते. उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरने पीडितेचा अश्लील व्हिडिओ बनवला आणि नंतर तो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. 2021 मध्ये आरोपी डॉक्टरची दुसऱ्या जिल्ह्यात बदली करण्यात आली होती. मात्र जेव्हा तो कानपूरला यायचा तेव्हा तो महिलेला फोन करून बलात्कार करायचा. आरोपी डॉक्टर प्रेम सिंह तिचा व्हिडिओ व्हायरल करून जीवे मारण्याची धमकी देखील देत होता.


दरम्यान, डॉक्टरांना गाठ पाहता यावी म्हणून महिलेने आपले स्तन डॉक्टरांना दाखवले. त्याच दरम्यान, टॉर्च घेऊन गाठ पाहण्याच्या बहाण्याने डॉक्टरने त्याचा व्हिडिओ काढला. डॉक्टर तिचा व्हिडीओ शूट करत असल्याचे महिलेला माहीत नव्हते. यानंतर डॉक्टरने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. शेवटी डॉक्टरच्या कृत्याला वैतागून महिलेने पोलिसांत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.