Crime News : मदरशात जाणाऱ्या अल्पवयीन मुलाला शेतात नेले अन्... 15 वर्षाच्या शेजाऱ्याचे धक्कादायक कृत्य
Crime News : मदरशात शिकणारा विद्यार्थी त्याच्या काही मित्रांसोबत खेळायला गेला होता. मुलगा घरी न परतल्याने कुटुंबीयांना मुलाची काळजी वाटू लागली, त्यानंतर त्यांनी मुलाचा शोध सुरू केला
Crime News : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) सहारनपुरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सहारनपूरच्या (Saharanpur) देवबंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात मोहरीच्या शेतात सोमवारी संध्याकाळपासून बेपत्ता झालेल्या मदरशात (madarsa) शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मदरशातील 11 वर्षीय विद्यार्थ्यावर अनैसर्गिक अत्याचार (Unnatural torture) करुन त्याचा गळा चिरून खून (UP Crime News) करण्यात आला. त्यानंतर मृतदेह मोहरीच्या शेतात फेकून दिला. सोमवारी सायंकाळपासून हा विद्यार्थी बेपत्ता होता. पोलिसांनी संशयावरून मृत विद्यार्थ्यासोबत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
सोमवारी 30 जानेवारी रोजी ही घडली. सहारनपूरच्या देवबंद भागात मृत विद्यार्थी मदरशात जाण्यासाठी घराबाहेर पडला होता. रात्री उशिरापर्यंत तो घरी न परतल्याने त्याच्या कुटुंबीयांनी शोध सुरू केला. बराच वेळ मुलगा न सापडल्याने मुलाचे कुटुंबिय पोलिसात गेले आणि याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी तपास सुरू करताच त्यांना जवळच्याच मोहरीच्या शेतात मृत मुलाची रक्ताने माखलेली टोपी आढळून आली. काही वेळाने 500 मीटर अंतरावर 10 वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह त्याच शेतात आढळून आला.
धक्कादायक बाब म्हणजे शेजारी राहणाऱ्या 15 वर्षाच्या मुलानेच हा सर्व प्रकार केल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. शेजारी राहणाऱ्या मुलाने त्या विद्यार्थ्याचा विळ्याने गळा चिरून हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी मुलाला अटक करून बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.
मृत विद्यार्थ्याच्या अंगावरील कपडे अस्ताव्यस्त पडलेले होते. यानंतर गावात एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधीक्षक डॉ.विपिन टाडा, एसपी देहाट सूरज राय यांच्यासह श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीम गावात पोहोचली आणि तपास सुरु केला.
कसा झाला खुनाचा उलघडा?
मृत मुलाचा मृतदेह मिळाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला. यादरम्यान त्यांना खुनाच्या आरोपीबाबत महत्त्वाची माहिती मिळाली. "या प्रकरणाच्या तपासादरम्यान आम्ही मदरशाजवळ बसवण्यात आलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज तपासले. यामध्ये आम्हाला आणखी एक अल्पवयीन मुलगा मृत मुलाला घेऊन जाताना दिसला. त्याच्याबाबत चौकशी केली असता स्थानिक लोकांनी तो मृत मुलाचा शेजारी असल्याची सांगितले. आम्ही लगेच त्याला ताब्यात घेतले आणि चौकशी सुरू केली. आरोपी मुलाने कबूल केले की त्यानेच मृत मुलावर लैंगिक अत्याचार केले आणि नंतर विळ्याने त्याचा गळा चिरला," सहारनपूरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक, विपिन टाडा म्हणाले.
दरम्यान, सहारनपूर पोलिसांनी आरोपी मुलाच्या घरातून हत्येसाठी वापरलेले शस्त्र जप्त केले. तसेच आरोपी मुलाचे रक्ताने माखलेले कपडेही पोलिसांना त्याच्या घरी सापडले आहेत.