पतीसमोर पत्नीवर सामूहिक बलात्कार; एवढ्यावरच न थांबता आरोपींनी दोघांची केली हत्या
UP Crime : उत्तर प्रदेशात एका महिलेचा तिच्या पतीसमोरच बलात्कार करुन दोघांचीही हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. यातील एक आरोपी अल्पवयीन असल्याचे समोर आलं आहे.
Crime News : उत्तर प्रदेशातून (UP Crime) एक हादरवणारी घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशात पतीसमोरच पत्नीवर बलात्कार (sexual harassment) करुन दोघांचीही हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपींनी जोडप्याला विष (poison) पाजून त्यांची हत्या केली आहे. पती पत्नीचा तडफडून मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (UP Police) घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. यातील एक आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
21 सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील रुधौली येथे हा सगळा प्रकार घडला आहे. सुरुवातीला पती-पत्नीने विष खाल्याची माहिती समोर आली होती. स्थानिकांच्या मदतीने या दाम्पत्याला सामुदायिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दोघांवर प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारांसाठी त्यांना बस्ती येथे जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र त्याच दिवशी सकाळी पतीचा मृत्यू झाला. त्यानंतर पत्नीला गोरखपूरच्या बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले. पण तिचाही शुक्रवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दोघांच्या मृत्यूनंतर रुधौली पोलिसांनी तात्काळ तपास सुरु केला आणि सगळं प्रकरण समोर आणलं. मयत पती हा शेती आणि गाडी चालवण्याचे काम करत होता. त्याच्या कुटुंबात पत्नी आणि दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार होता. पोलिसांनी मुलांकडे चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. घरापासून काही अंतरावर राहणाऱ्या दोघांनी आईचा विनयभंग केल्याने वडिलांना त्यांना विरोध केला होता, असे मृत दाम्पत्याच्या मुलांनी पोलिसांना सांगितले.
त्यानंतर पोलिसांनी सखोल तपास करुन या प्रकरणात दोन्ही आरोपींना अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपींनी जबरदस्तीने घरात घुसून महिलेवर तिच्या पतीसमोर सामूहिक बलात्कार केला. यानंतर त्यांनी दाम्पत्याला विष पाजून घटनास्थळावरून पळ काढला. विष प्यायल्याने या दाम्पत्याची प्रकृती खालावली. त्यानंतर मुलांनी स्वतःच त्यांच्या पालकांच्या मृत्यूचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. व्हिडीओमध्ये या जोडप्याने संपूर्ण घटनाक्रम सांगितला होता. त्यानंतर या दाम्पत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.