UP Crime: गुन्हा केल्यानंतर कायद्याच्या कचाट्यापासून वाचण्यासाठी अनेग गुन्हेगार वेश बदलून राहतात. आपण पोलिसांच्या हाती कधी सापडणार नाही, असे त्यांना वाटत असते. पण कायद्याचे हात लांब असतात, असं म्हणतात. चोर, गुन्हेगार काहीतरी चूक करतात आणि पोलिसांच्या तावडीत सापडतात. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशमधून समोर आलाय.दिवसा भीक मागणे आणि रात्री चोरी करणे यासह गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या रामाधर उर्फ ​​धारुआ कांजड अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. पोलिसांपासून वाचण्यासाठी त्याने साधूचा वेश धारण केला होता. तो साधू बनून हरियाणात राहू लागला. पण आईच्या मृत्यूची माहिती मिळाल्याने तो घरी परतला. यानंतर चोरट्याला तब्बल 32 वर्षांनंतर पोलिसांनी अटक केली आहे.


अट्टल गुन्हेगार 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशयेथील जलालाबादच्या बरेली-सराय साधाऊ गावातील रहिवासी रामधर उर्फ ​​कांजद हा एक अट्टल गुन्हेगार आहे. त्याच्याविरोधात जलालाबाद पोलिस ठाण्यात दरोडा, खून, खुनाचा प्रयत्न, चोरी असे 10 गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्यांची लांबलचक यादी पाहून पोलिसांनी त्याच्यावर 1993 साली कारवाई केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीविरुद्ध 1992 मध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून तो फरार होता. तो हजर न झाल्यामुळे न्यायालयाने त्याच्याविरुद्ध कायमस्वरूपी वॉरंट जारी केले होते. 32 वर्षे तो पोलिसांना चकमा देत राहिला.


पोलिसांपासून वाचण्यासाठी रामधरने वेश बदलला होता. त्याचे लांब केस होते आणि दाढी वाढली होती. तो साधूचा वेश धारण करून हरियाणात राहू लागला. रामधर विरोधात वॉरंट जारी झाल्यानंतर पोलिस सुगावा शोधण्यात व्यस्त होते. पण रामधरच्या आईचे बुधवारी निधन झाले. हे वृत्त कळताच तो घरी परतेल अशी माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर इन्स्पेक्टर प्रदीप राय यांनी एक टीम तयार केली आणि रामधरच्या गावातील घरावर छापा टाकला. येथे साधूच्या वेशात आलेल्या रामधरला पकडण्यात आले. त्याला पोलीस ठाण्यात आणून चौकशी करण्यात आली. 32 वर्षांनंतर आरोपीला अटक करण्यात आल्याचे निरीक्षकांनी सांगितले.


पोलिसांपासून वाचण्यासाठी आपण वेश धारण 


वॉरंट जारी झाल्यामुळे पोलीस त्याच्या गावात चकरा मारत राहिले. तो आल्यावर लगेच माहिती देण्यास सांगितले. घरातील सदस्य आपल्या त्याच्याशी काही संपर्क होत नसल्याचे सांगून पोलिसांना गुंगारा द्यायचे. आईच्या मृत्यूनंतर काम तो घरी आला तेव्हा पोलिसांची माहिती देणारी यंत्रणा कामाला लागली. पोलिसांनी बोगस साधूला पकडले. यानंतर त्याने पोलिसांना फसवण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने सत्य स्वीकारले. पोलिसांपासून वाचण्यासाठी आपण वेश धारण केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. रामधर हरियाणात कायमस्वरूपी वास्तव्य राहिला नव्हता. तो सतत इकडे तिकडे फिरत राहायचा, अशी माहिती पोलिसांनी दिली.