UP Election 2022 : केंद्रापासून राज्यांपर्यंतच्या निवडणुकांमध्ये नेहमीच चर्चेत असणारा राममंदिराचा (Ram Mandir) मुद्दा उत्तर प्रदेशच्या निवडणुकीतही मुख्य मुद्दा असणार आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुका (Uttar Pradesh Election 2022) ‘राम’ नामाशिवाय अपूर्ण आहेत. पण इथे एक विधानसभा (UP Assembly Seat) जागा अशी आहे जिथे फक्त आणि फक्त 'राम' नावचं चालतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राम नावाची अद्भुत जादू 
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत (UP Election) राम मंदिराचा मुद्दा वरचढ ठरणार हे निश्चित. पण रामाचं जन्मस्थान असलेल्या अयोध्येत (Ayodhya) एक जागा अशी आहे, जिथे रामाच्या नावाशिवाय विधानसभा निवडणुकीची कल्पनाही करता येणं शक्य नाही. या जागेवर विजयी झालेल्या बहुतांश उमेदवारांच्या नावामध्ये 'राम' हा शब्द आहे.


अयोध्येतील बिकापूर विधानसभेची जागेवर (Bikapur Assembly Seat) राम नावाच्या उमेदवारांचं वर्चस्व आहे आणि हा खरोखरच विलक्षण योगायोग आहे. आतापर्यंत इथं असे 10 आमदार आहेत ज्यांच्या नावात राम हा शब्द जोडला गेला आहे.


1974 पासून सुरु आहे परंपरा
1962 साली अस्तित्वात आलेल्या बिकापूर विधानसभा जागेवर काँग्रेसचे अखंड प्रताप सिंह पहिल्यांदा इथून आमदार म्हणून निवडून आले. पण यानंतर 1974 पासून इथे राम नावाची परंपरा सुरु झाली. 1974 मध्ये  नावात राम असलेले काँग्रेस उमेदवार सीताराम निषाद आमदार म्हणून विजयी झाले. यानंतर तब्बल सहा वेळा ते या जागेवर निवडून आले. 


त्यांच्यानंतर दुसरे आमदार निवडून आले त्यांच्या नावातही राम नाव जोडलं होतं. त्यांचं नाव होतं संत श्रीराम द्विवेदी. द्विवेदीही या जागेवर तीनवेळा आमदार म्हणून जिंकून आले. आधी जनता पार्टीच्या नंतर भाजपच्या तिकिटावर ते विजयी झाले. 


यानंतर 1993 मध्ये समाजवादी पक्षाच्या परशुराम यांनी विजय मिळवत राम नावाची परंपरा कायम ठेवली.


10 वेळा राम नावाचे आमदार
1974 पासून 2017 पर्यंत तब्बल 10 वेळा बिकापूर विधानसभा जागेवर राम नावाचे उमेदवार जिंकून आले आहेत. राम नाव नसलेल्या आमदारांना 2007 नंतरच इथे पहिल्यांदाच यश मिळवता आलं. 2007 मध्ये बसपचे जितेंद्र सिंह बबलू, 2012 मध्ये सपाचे मित्रसेन यादव, 2016 मध्ये सपाचे आनंदसेन यादव आणि 2017 मध्ये भाजपच्या शोभा सिंह चौहान विजयी झाले होते. यावेळी या जागेसाठी 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. यावेळी कोणत्या उमेदवाराचं नशीब चमकते ते पाहूया.