नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (Rss) सहा कार्यालये बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. अल अन्सारी इमाम रजी उन मेहंदी नावाचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून कन्नड, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये ही लिहिण्यात आली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (Rss) सहा कार्यालये उडवून देण्याची धमकी देण्यात आल्या प्रकरणी लखनऊमधील मादियानव पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. धमक्या देणाऱ्या लोकांची माहिती घेतली जात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल.


याशिवाय, व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये कर्नाटकातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विविध कार्यालयांचे चार ठिकाणच्या पत्ते नमूद असल्याचे सांगितले जात आहे. आरएसएसचा एक कार्यकर्ता इन्व्हाईट लिंकद्वारे 'अल इमाम अन्सार राजें मेहंदी' नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील झाला होता. या व्हॉट्सअॅप ग्रुपची इन्व्हाईट लिंक अनेक ग्रुप्समध्ये शेअर केली जात होती, त्यामुळे आरएसएस कार्यकर्ताही ती ओपन करून जॉईन झाला.


ग्रुपमध्ये सामील झाल्यानंतर, त्यांनी पाहिले की संघाच्या कार्यालयांना लक्ष्य केले जात आहे. त्यांनी दखल घेत अवध प्रांताच्या संघाच्या वरिष्ठांना माहिती दिली. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात आली.