पूजा-अर्चना करून योगी आदित्यनाथांनी केलं मतदान
उत्तरप्रदेशमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आज मतदान होतंय.
लखनऊ : उत्तरप्रदेशमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आज मतदान होतंय.
पहिल्या टप्प्यात 24 जिल्ह्यातील 230 स्थानिक स्वराज्य संस्थासाठी निवडणुका होताहेत. कडक बंदोबस्तात आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली असून संध्याकाळी पाच वाजता हे मतदान असेल.
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूर येथे आपल्या मतदानाचा हक्क बजावला. भारतीय जनता पार्टीने मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मोठं मताधिक्य मिळवलं होतं. यासाठी योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश मिळवणं भाजपसाठी महत्त्वाचं ठरणार आहे.
मुख्यमंत्री योगी यांनी बुधवारी आपल्या दिवसाची सुरुवात गोरखनाथ मंदिरात पूजा - अर्चना करून केली.
यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी निवडणूक प्रचाराची धुरा आपल्या हाती घेतली होती. या निवडणुकीचा निकाळ 1 डिसेंबरला जाहीर होणार आहे. भाजपसोबत सपा, बसपा आणि काँग्रेसनेही ही निवडणूक प्रतिष्ठेची केलीय.