एक पंखा, दोन बल्ब आणि टीव्ही! वीज बिल पाहून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल
Unnao News : वीज विभागाने पाठवलेलं लाखो रुपयांचं बिल पाहून एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्यची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत तरुणाच्या वडिलांनी मुलाच्या मृत्यूला वीज विभागाला जबाबदार धरलं आहे. तर वीज विभागातील अधिकाऱ्याने कौटुंबिक कारणातून आत्महत्या केल्याचं म्हटलं आहे.
वाढीव वीज बिल पाहून एका तरुणाने गळफास घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा तरुण एका छोट्याशा घरात राहात होता. त्याच्या घरात एक पंखा, दोन बल्ब आणि एक छोटासा टिव्ही आहे. पण वीज विभागाने या तरुणाला लाखोंचं वीज बिल पाठवलं. वीज बिलावरील आकडा पाहून या तरुणाने टोकाचं पाऊल उचललं. छोट्याशा घरात राहाणाऱ्या या तरुणाला वीज विभागने आधी एक लाख रुपायंचं बिल पाठवलं. त्यानंतर दुसऱ्या महिन्यात आठ हजारांचं बिल पाठवलं. यामुळे हा तरुण मानसिक तणावाखाली होता. बिल कसं भरायचं या चिंतेत त्याने आत्महत्येचा निर्णय घेतला
वीज विभागावर गंभीर आरोप
आपल्या मुलाच्या मृत्यूला वीज विभागातील अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप तरुणाच्या वडिलांनी केला आहे. वीज विभागाकडून दर महिन्याला वाढिव बिल पाठवण्यात येत असल्याने आपाल मुलगा त्रस्त होता. तक्रार केल्यानंतरही त्याकडे अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केलं जात होतं. यातूनच मुलाने आत्महत्या केल्याचं वडिलांचं म्हणणं आहे. तर तरुणाच्या आत्महत्येमागे कौटुंबिक वाद असल्याचं उत्तर वीज विभाग अधिकाऱ्यांनी दिलं आहे.
ही संपूर्ण घटना उत्तर प्रदेशमधील उन्नाव इथल्या कुशलपूर वसैना गावात घडली. या गावात शुभम राजपूत हा तरुण मजूरी करुन आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करत होता. घरात केवळ एक पंखा, दोन बल्ब आणि एक टिव्ही या व्यतिरिक्त वीजेवर चालणारं एकही उपकरण नव्हतं. यानंतरही वीज विभागाने शुभम राजपूताल लाख रुपयांचं बिल पाठवलं. त्यानंतर पुढच्याच महिन्यात 8 हजार रुपायंच बिल पाठवलं. इतके पैसे कसे भरायचे या चिंतेने शुभम मानसिक तणावात गेला आणि यातूनच त्याने आत्महत्या केल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे.
शुभनने 2022 मध्ये 600 रुपये डिपॉझिट भरत वीज जोडणी घेतली होती. तेव्हापासून बिल बरोबर येत होतं. पण सप्टेंबर 2024 मध्ये शुभमला वीज विभागाने अचानक 1 लाख 9 हजार 221 रुपयांचं बिल पाठवलं. यानंतर शुभमने वीज विभागाकडे धाव घेतली. मोठी धावाधाव केल्यानंतर अखेर शुभमने 16, 377 रुपये जमा केले. पण यानंतर ऑक्टोबर महिन्यात शुभमला पुन्हा 8,223 रुपयांचं बिल पाठवण्यात आलं.
तरुण मुलाच्या जाण्याने कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवून दिला. धक्कादायक म्हणजे शुभमच्या मृत्यूनंतर वीज विभागने केलेल्या तपासात शुभमच्या घरचं बिल केवळ 150 रुपये इतकंच होतं. ऑनलाईन वीज बिलाता काही तांत्रिक बिघाड झाल्याने वीज विभागाकडून वाढिव वीज बिल पाठवण्यात आलं.
वीज विभागाच्या या अक्षम्य चुकीमुळे एका तरुणाला मात्र नाहक आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे वीज विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्तित केले जात आहेत.