Trending News : खून, चोरी, दरोडा किंवा पती-पत्नीच्या भांडणाच्या तक्रारी घेऊन पोलीस स्थानकात अनेकजण येताना आपण पाहिले असतील. पण सोशल मीडियावर (Social Media) सध्या एका प्रकरणाची चांगलीच चर्चा आहे. चक्क लग्न होत नसल्याने एका तरुणाने थेट पोलीस स्थानक गाठलं. लग्नासाठी एक मुलगी शोधावी यासाठी या तरुणाने पोलिसांत तक्रार दाखल केलीय. आपण खूप दु:खी आहोत, छान जेवण बनवणारी पत्नी हवी आहे. थंडीचा हंगाम सुरु झाला आहे. असं या तरुणाने आपल्या तक्रारीत नमुद केलं आहे. उत्तर प्रदेशमधल्या बीनपूर गावात राहाणारा 40 वर्षांचा या तरुणाचं नाव नीरज यादव असं आहे. नीरज यादवची तक्रार ऐकून पोलीस हैराण झाले. त्याने नीरजच्या कुटुंबियांना पोलीस स्थानकात बोलावून त्यांना समज दिली आणि नीरजला घेऊन जाण्याचे आदेश दिले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्न होत नसल्याने नीरज यादव मानसिकरित्या खचला असल्याचं त्याच्या कुटुंबियांनी पोलिसांना सांगितलं. नीरजने आपल्या तक्रारीत लग्नासाठी पत्नी शोधून देण्याची विनंती केली होती. इतकंच नाही तर थंडीचा हंगाम सुरु झाला आहे, जेवणाच्या खूप समस्या होतात, असं नीरजने आपल्या तक्रारीत म्हटलं होतं. नीरज यादवची तक्रार ऐकून पोलिसांचा पारा चढला. त्यांनी नीरजच्या कुटुंबियांना बोलावून घेतलं. नीरजची मानसिक स्थिती ठिक नसल्याचं त्याच्या कुटुंबियांना सांगितलं. त्यानंतर त्याचं कुटुंब नीरजला घेऊन गेले. 


अजीम अंसारीसारखीच स्टोरी
नीरज यादवमुळे काही दिवसांपूर्वीच घडलेल्या अजीम अंसारीच्या स्टोरीची सर्वांना आठवण झाली. शामली इथं राहाणारा अजीम अंसारी याची उंची अडीच फूट इतकी आहे. कमी उंचीमुळे अजीमचं लग्न होत नव्हतं. आपलं लग्न व्हावं यासाठी अजीमने पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. इतंकच काय तर मुख्यमंत्र्यांपासून पंतप्रधानांपर्यंत सर्वांना त्याने पत्र पाठवलं. मोठ्या धावपळीनंतर अखेर नोव्हेंबर 2023 मध्ये अजीम अंसारीची इच्छा पूर्ण झाली. त्याच्याच उंचीच्या मुलीबरोबर अजीमचा थाटामाटात निकाह पार पडला. 


तक्रार द्यायला गेलेल्या तरुणीचं लग्न
दरम्यान, लग्नाचा असाच एक अनोखा प्रकार समोर आला आहे. तरुणाची तक्रार देण्यासाठी गेलेल्या एका तरुणीचं पोलिसांच्या साक्षीने लग्न लावून देण्यात आलं. तरुण आणि तरुणीने आधीपासून एकमेकांना ओळखत होते, गेल्या एक वर्षापासून ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होते. यादरम्यान मुलाने त्या मुलीला अनेकवेळा लग्नाचं आश्वासन दिलं. पण तरुणाचं कुटुंबिय या लग्नास तयार नव्हते. अखेर तरुणीने तरुणाविरोधात लग्नाचं आमिष देत लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली. यानंतर पोलिासांनी तरुण-तरुणी आणि दोघांच्या कुटुंबियांनाही पोलीस स्थानकात बोलावून घेतलं. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर दोन्ही कुटुंबियांना जवळच्या शीवमंदिरात मुलामुलीचं लग्न लावून दिलं.