उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) फिरोजाबादमध्ये (firozabad) धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. टोल टॅक्स वाचवण्याच्या उद्देशाने एका व्यक्तीने पोलिस निरीक्षकाचा गणवेश बनवला आणि तो घातल्याचा प्रकार समोर आला आहे. (Fake Police Inspector) पोलिसांना याची माहिती मिळताच त्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. रविवारी उत्तर प्रदेशच्या (firozabad) फिरोजाबादमध्ये पोलिसांनी एका तोतया पोलीस निरीक्षकाला अटक केली. पोलिसांचा गणवेश घालून हा व्यक्ती वाहन तपासणीच्या नावाखाली लोकांकडून अवैध वसुली करत असे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टुंडला पोलिसांनी अटक केलेला आरोपी फिरोजाबाद येथील पोलिसांच्या गणवेशात वाहनांची तपासणी व चालान करण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून अवैधरित्या वसुली करत होता. अटक करण्यात आलेला आरोपी गाझियाबाद जिल्ह्यातील रहिवासी आहे. आरोपीच्या ताब्यातून पोलीस निरीक्षकाचे बनावट ओळखपत्रही जप्त करण्यात आले आहे.  मुकेश यादव असे अटक आरोपीचे नाव आहे.


सर्कल ऑफिसर टुंडला हरिमोहन सिंग यांनी सांगितले की, आरोपी कार क्रमांक डीएल 1 सीटी 2958 मध्ये फिरत होता आणि पोलिसांचा गणवेश परिधान केलेल्या वाहनांची तपासणी करत होता. तो वाहन चालकांविरुद्ध चलान कारवाईची धमकी देऊन त्यांच्याकडून वसुली करत होता. आरोपीला टुंडला पोलिसांनी उसायनी गावाजवळील बायपासवरून अटक केली आहे.


मुकेश यादवचे वजन सुमारे 150 किलो आहे आणि वय 23 वर्षे आहे. फिरोजाबाद पोलिसांना याबाबत माहिती मिळाली होती की, फिरोजाबाद जिल्ह्यातील एक पोलीस निरीक्षक ताज एक्सप्रेस वेवरून उतरताच वाहनांकडून अवैधरित्या वसुली करत होता. या माहितीच्या आधारे पोलिसांनी रविवारी रात्री राजा उसैनी गावाजवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-२ वर छापा टाकला. तेथे पोलिसांना एक वॅगनआर कार सापडली. पोलिसांच्या गणवेशावर तीन तारे लावलेला एक माणूस गाडीत बसला होता.


 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Zee News (@zeenews)


पोलिसांनी गाडीत बसलेल्या व्यक्तीची कडक चौकशी केली असता त्याने सर्व हकीकत सांगितली. आरोपी मुकेश यादव हा गाझियाबादचा रहिवासी आहे. चौकशीत तो खासगी बस व ट्रकमधून चेकिंगच्या नावाखाली अवैध वसुली करत असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचवेळी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता, तेथून त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.