शाळेत (School) असताना तुमच्या शिक्षकाची (Teacher) भूमिका खूप खास असते. त्यामुळे शाळेतील शिक्षकाने दिलेली शिक्षाही काही वेळा योग्य असल्याचं म्हटलं जातं. पण काही शिक्षक हे असं काही कृत्य करतात की त्यांची किळस वाटते. लहान मुलांना अनेकवेळा आपल्या पालकांशिवाय शाळेत भीतीदेखील वाटते. काही वेळा पालक जवळ नसल्याने मुलं शाळेतच शी किंवा शु करुन टाकतात. पण शाळेतील शिक्षकही समजूतादारपणे मुलं लहान असल्याने त्या कृ्त्याकडे दुर्लक्ष करतात आणि मुलांना व्यवस्था करतात. मात्र उत्तर प्रदेशातील एका शाळेतून विचित्र प्रकार समोर आलाय. शाळेत एका लहानग्याने शौच केल्याने शाळेने केलेल्या कृत्याने सर्वांनाच धक्का बसलाय. (UP school cut off the student name for defecating in the class headmaster told father clean it)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मुझफ्फरनगर येथील शाळेत एका 5 वर्षाच्या मुलाने वर्गातच शौच (defecation) केली. त्यानंतर मुलाच्या पालकांना शाळेतून फोन आला आणि मुलाला घरी घेऊन जाण्यास सांगितले. यानंतर शाळेकडून मुलाच्या वडिलांना पत्र पाठवण्यात आले. या पत्रामध्ये मुलाचे नाव शाळेतून काढून टाकण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे मुलाच्या पालकांना धक्का बसलाय. मात्र हे प्रकरण समोर आल्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी या प्रकरणी उत्तर मागितलय.


मीरापूर शहरातील सरस्वती शिशु विद्या मंदिर शाळेत सोमवारी ही घटना घडली. शाळेत शिकणाऱ्या पाच वर्षाच्या मुलाने वर्गातच शौच केली होती. याचा राग आल्याने मुख्याध्यापकांनी शिक्षा म्हणून त्याचे नाव शाळेतून काढून टाकले. यानंतर मुलाच्या वडिलांनी मुख्याध्यापकांना भेटण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी भेटण्यास नकार दिला. तसेच पालकांनाच मुलाचे शौच साफ करण्यास सांगितले, असे मुलाच्या वडिलांनी सांगितले.


"माझ्या मुलाने वर्गात शौच केली. मला शाळेतून मुलाला घेऊन जा असे सांगणारा फोन आला. मी मुलाला घेऊन आलो. त्यानंतर चार वाजता मुलाचे नाव शाळेतून काढून टाकल्याचे पत्र आले," असे मुलाचे वडील म्हणाले.


मुख्याध्यापकांनी सांगितल्याप्रमाणे शौच साफ न केल्याने मुलाचे नाव शाळेतून काढून टाकण्यात आलं. आता मुलाच्या वडिलांनी शाळेची पैसे परत करावे अशी मागणी शाळेकडे केली आहे.


दरम्यान, मीरापूरचे गटशिक्षणाधिकारी प्रमोद शर्मा यांनीही या प्रकरणाची दखल घेत शाळेच्या मुख्याध्यापकांना नोटीस पाठवली आहेत. तसेच शाळेला या प्रकरणाचा खुलासा करण्यास सांगितले आहे. त्यामुळे आता शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई होऊ शकते.