UP News : उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) एका वाहतूक पोलिसाने एका वृद्धा व्यक्तीला रस्त्याच्या कडेला ढकलून दिल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल (Viral Video) होत आहे. वाहतूक पोलीस हवालदाराने सायकलस्वार एका वृद्धाला रस्त्यावरून ढकलून खाली पाडलं आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य (Keshav Prasad Maurya)यांचा ताफा जात असताना वाहतूक पोलिसाने वृद्धाला धक्का दिला आणि खाली पाडले. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर आता सरकारवर टीका केली जात आहे. समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा अखिलेश यादव यांनीही ट्वीट करुन याचा निषेध नोंदवला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या ताफ्यादरम्यान, वाहतूक पोलीस निरीक्षकाने सायकलवरून येणाऱ्या एका वृद्धाला रस्त्यावरून ढकलून दिलं. यामुळे सायकलस्वार वृद्ध व्यक्ती रस्त्यावरून जाऊन खड्ड्यात पडली. त्याच्यासोबत त्याची सायकलही पडली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ 27 ऑगस्टचा आहे, जेव्हा उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य मऊ जिल्ह्यातील सरायसाडी भागात एका कार्यक्रमाला जात होते. उपमुख्यमंत्र्यांचा ताफा निघाल्यावर सायकलस्वाराला रस्त्यावर येऊ दिले.


नेमकं काय घडलं?


व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक वाहतूक पोलीस निरीक्षक उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्याची वाट पाहत रस्त्यावर उभा होता. त्यावेळी रस्त्यावरुन वाहने जात होती. त्याचवेळी एक वृद्ध व्यक्ती सायकलवरून जात होती. वाहतूक पोलीस निरीक्षक वृद्ध व्यक्तीला बाजूला जायला सांगत होता. त्यावेळी वाहतूक पोलिसाने ताफ्याचा आवाज ऐकला. वृद्ध व्यक्ती रस्त्याच्या कडेने चालत असतानाही पोलिसाने त्याला हाक मारून थांबवले. वृद्ध व्यक्तीला काहीच समजले नाही आणि तो तसाच पुढे गेला. इतक्यात वाहतूक पोलीस निरीक्षक त्या वृद्धाकडे धावत गेला आणि त्याला थांबायला सांगितले. ताफा जवळ येताच वाहतूक पोलिसाने  पटकन त्या वृद्धाच्या सायकलला रस्त्याच्या कडेला ढकलून दिले. वृद्ध अडखळत रस्त्याच्या कडेला जाऊन पडला. त्यानंतर सगळा ताफा तिथून गेला. त्यानंतर वृद्ध व्यक्ती आणि वाहतूक पोलीस दोघेही एकमेकांकडे बघत राहिले.



हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अखिलेश यादव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "उत्तर प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर जनतेला महत्त्व नाही. असो, घोसीमध्ये भाजपला मत मिळत आहे. आता या सायकलस्वारामुळे एका मतात आणखी घट झाली आहे. घोसीने भाजपचा पराभव करण्याचे घोषित केले आहे," असे अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे.