UPSC Result | 6 मुख्य परीक्षा - 4 मुलाखती देऊनही अपयशीच, उमेदवाराची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी
UPSC Result 2022 | देशात लाखो उमेदवार IAS अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहतात, परंतु ते इतके सोपे नाही. ही देशातील सर्वात कठीण परीक्षा आहे, ज्यामध्ये उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थी वर्षानुवर्षे तयारी करत असतात.
अमरावती : देशात लाखो उमेदवार IAS अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहतात, परंतु ते इतके सोपे नाही. ही देशातील सर्वात कठीण परीक्षा आहे, ज्यामध्ये उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थी वर्षानुवर्षे तयारी करत असतात. रात्रंदिवस अभ्यास करतात. परंतू देशात असंख्य असे उमेदवार आहेत, आहेत जे कठोर परिश्रम करतात, खूप मेहणत घेतात परंतू परीक्षा उत्तीर्ण होऊ शकत नाही. त्यांच्या हाती फक्त निराशाच येते. अशाच एका उमेदवाराने ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त केली. (UPSC Civil Services Final Result 2021)
यंदाची UPSC टॉपर उत्तर प्रदेशातील श्रुती शर्मा आहे, तर दुसरी टॉपर अंकिता अग्रवाल आणि गामिनी सिंगला तिसऱ्या टॉपर आहेत. एकीकडे परीक्षेतील यशस्वी उमेदवार खूप आनंदी आहेत तर, दुसरीकडे असे काही उमेदवार आहेत ज्यांनी खूप मेहनत घेतली, पण त्यांना यश मिळू शकले नाही. अमरावतीचा रहिवासी असलेला कुणाल विरूळकर हाही त्यापैकीच एक.
त्याने वर्षानुवर्षे कठोर परिश्रम केले, अनेकवेळा मुख्य परीक्षा आणि मुलाखतही दिली. परंतू त्याची निवड होऊ शकली नाही. अशा परिस्थितीत त्याने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली. (IAS Officer)
कुणालने आपल्या ट्विटर पोस्टमध्ये लिहिले आहे की, 6 वेळा मुख्य परीक्षा, 4 वेळा मुलाखती देऊनही त्याची यूपीएससीमध्ये निवड होऊ शकली नाही.
या अपयशाने हताश झालेल्या कुणालने म्हटलं की, 'नशिबात काय लिहिलंय काय माहिती?' त्याच्या पोस्टला 10 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले असून विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. लोकांनी कुणालला हार मानू नका आणि प्रयत्न करत राहण्याचा सल्ला दिला आहे.