इराणसोबतच्या (iran) व्यापारामुळे अमेरिकेने (US) एका भारतीय (India) पेट्रोकेमिकल कंपनीवर (petrochemical company) बंदी घातली आहे. इराणवर (iran) लादलेल्या निर्बंधांमुळे अमेरिकेने भारतीय कंपनीवर कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ आहे. अमेरिकेच्या कोषागार विभागाने (US Treasury Department) 30 सप्टेंबर रोजी एक निवेदन जारी करत ही बंदी घातली आहे. मुंबईतील तिबालाजी पेट्रोकेमिकल प्रायव्हेट लिमिटेड (Tibalaji Petrochemical Private Limited) या कंपनीने लाखो डॉलर्सचे (Dollar) पेट्रोलियम पदार्थ (petroleum products) इराणमधून ((iran) खरेदी करुन चीन आणि इतर देशांमध्ये विकले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेने भारतीय कंपनीसह आणखी 7 कंपन्यांवर बंदी घातली आहे. त्यापैकी यूएई आणि हाँगकाँगमधील कंपन्या आहेत. यूएस ट्रेझरी डिपार्टमेंटच्या म्हणण्यानुसार, तिबालाजी पेट्रोकेमिकल प्रायव्हेट लिमिटेडने लाखो डॉलर्सची इराणी ब्रोकर कंपनी ट्रिलायन्सची उत्पादने खरेदी केली आणि त्यांची चीनला निर्यात केली. ट्रेझरी डिपार्टमेंट ऑफ फॉरेन अॅसेट्स कंट्रोल (OFAC) ने कंपन्यांवर हे निर्बंध लादले आहेत.


चिनी कंपन्यांवर बंदी घालण्याची तयारी


ट्रायलायन्स ही इराणमधील मध्यस्थ कंपनी आहे जी पेट्रोलियम उत्पादने विकण्यासाठी इतर देशांतील कंपन्यांशी व्यवहार करते. कोषागार विभागाने म्हटले आहे की, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्रालय झोन्घु स्टोरेज अँड ट्रान्सपोर्टेशन कंपनी लिमिटेड आणि डब्ल्यूएस शिपिंग कंपनी लिमिटेड या दोन चिनी कंपन्यांवर निर्बंध लादण्याची तयारी करत आहे. या कंपन्या इराणच्या पेट्रोकेमिकल व्यवसायातही सहभागी आहेत.


अमेरिकेच्या कोषागार विभागाने इराणस्थित पेट्रोकेमिकल ब्रोकर्स इराण केमिकल इंडस्ट्रीज इन्व्हेस्टमेंट कंपनी आणि मिडल ईस्ट किमिया पार्स कंपनी यांच्याकडून लाखो डॉलर्सचे पेट्रोकेमिकल आणि पेट्रोलियम उत्पादने खरेदी केल्याचा आणि भारतात पाठवल्याचा आरोपही केला आहे.


अमेरिकेची इराणवर बंदी


2018 मध्ये इराण आण्विक करारातून माघार घेतल्यानंतर अमेरिकेने अनेक निर्बंध जाहीर केले. अमेरिकेने इराणकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांना इराणकडून तेल आयात बंद करण्यास सांगितले. 2018-19 या वर्षात भारताने इराणकडून 9 लाख 79 हजार कोटी रुपयांहून अधिक किमतीचे कच्चे तेल आयात केले. मे 2019 मध्ये अमेरिकेच्या निर्बंधांनंतर भारताने इराणकडून कच्च्या तेलाची आयात बंद केली.


दरम्यान, भारताचे इराणशी संबंधही चांगले आहेत. इराणच्या चाबहार बंदरात भारताने अब्जावधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. या बंदराच्या माध्यमातून भारताचा अफगाणिस्तान आणि मध्य आशियाई देशांशी व्यापार करणे सोपे होणार आहे.