नवी दिल्ली : अमेरिका इराणमधील संघर्ष पेटला आहे. याचे परिणाम जगभरात जाणवू लागले आहेत. नव्या संघर्षामुळे खनिज तेलाच्या किंमतीचा भडका उडणार आहे. आंततराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमती जवळपास तीन टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. कच्चा तेलाचे दर प्रती बॅरल ६८ डॉलर्सवर आहेत. याचे परिणाम परकी चलन विनिमय मंचावरही उमटले. रूपयाने ४२ पैशांची आपटी खाल्ली. रूपयाचा दर डॉलरच्या तुलनेत ७१.८० डॉलरवर पोहोचला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या दीड महिन्यात रूपयाने गाठलेला हा निच्चांकी स्तर आहे. तेलसंकट सोडवण्यासाठी भारताने तातडीने पर्यायांचा विचार सुरू केलाय. इराक, सौदी अरेबिया, इराक आणि युएई या भारताच्या तेलपुरवठादार देशांवर सध्या संकट आहे. त्यामुळे आता आखाती देशांव्यतिरिक्त अमेरिका, कॅनडा, मेक्सिकोकडून तेल खरेदी करण्याचा भारताचा विचार असल्याचं सांगण्यात येतंय. 


तेलाच्या दरात प्रती बॅरल १० डॉलरची वाढ झाल्यास त्याचा भारतावर मोठा परिणाम होतो. भारतात पेट्रोल डिझेलचे भाव वाढतील आणि महागाई वाढेल.



इराकवर हल्ला 


अमेरिकेने सलग दुसऱ्या दिवशी इराकची राजधानी बगदादमध्ये हवाई हल्ला चढवला असून यामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला. गुरुवारी रात्री उशीरा अमेरिकेने बगदाद एअरपोर्टवर हल्ला चढवत इराणच्या लष्कराचे वरिष्ठ कमांडर जनरल कासीम सुलेमानी यांना ठार मारलं.