मुंबई : एटीएम हे आपल्यापैकी प्रत्येक व्यक्ती वापरतो. पैसे काढण्यासाठी एटीएमचा वापर केला जातो. पूर्वी पैसे काढण्यासाठी लोकांना बँकेत जावं लागायचं आणि यासाठी त्यांना तासनं तास रांगेत उभं राहावं लागत होतं. परंतु आता एटीएम नं तुमचं काम सोपं केलं आहे. यामुळे तुमचा वेळ तर वाचतोच शिवाय तुम्ही कधीही कुठूनही गरजेनुसार पैसे काढू शकतात. पण प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असताता. त्यामुळे त्याच्या फायद्यासोबतच त्यामुळे नुकसानं देखील होण्याची भिती असते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एटीएमच्या बाबतीत देखील असंच आहे. काही सायबर गुन्हागारांनी चोरी करण्याच्या आपल्या पद्धती देखील बदलल्या आहेत. त्यामुळे तुम्ही देखील एटीएममधून पैसे काढताना सावध राहा.


तसे पाहाता सध्या लोक पैसे पाठवण्यासाठी ऑनलाईन पर्यायांकडे वळले आहेत. परंतु रोख रकमेसाठी आणि अनेक कारणांमुळे लोक अजूनही एटीएमचा वापर करतात. परंतु याचाच फायदा गुन्हेगार घेतात.


एटीएमशी संबंधीत एक धक्कादायक घटना राजधानी दिल्लीतून समोर आली आहे. येथे युक्तीचा वापर करुन गुन्हेगारांनी लोकांचे पैसे लूटले आहेत. त्यांची ट्रिक ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.


पीरबहोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बिर्ला मंदिराजवळील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या एटीएमच्या कॅश डिस्पेन्सरमध्ये चोरट्यांनी स्टीलचे पान टाकून अनेक ग्राहकांचे पैसे उडवले. ग्राहकांच्या तक्रारीवरून बँकेने केलेल्या तपासणीत एटीएमच्या कॅश डिस्पेन्सरमध्ये स्टीलची पट्टी अडकवल्याचे आढळून आले. याप्रकरणी बँक व्यवस्थापकाच्या वतीने पीरबहोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.


खरेतर एटीएममधील कॅश डिस्पेंसरमध्ये चोरट्यांनी स्टीलची पट्टी अडकवली. अशा स्थितीत पैसे काढण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नोट बाहेर येण्याऐवजी मशीनमध्येच अडकायच्या आणि ग्राहकाच्या मोबाइलवर पैसे कट झाल्याचा मेसेज यायच्या हे अनेक ग्राहकांच्या बाबतीत असा प्रकार घडला. ज्यामुळे ग्राकांच्या तक्रारीवरुन बँकेने याची दखल घेतली, ज्यामुळे हा संपूर्ण प्रकार उघड झाला.


एफआयआर दाखल करणाऱ्या पीरबहोर पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी बँक व्यवस्थापनाला एटीएममध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज मागितले आहे.


जेणेकरून फुटेजच्या आधारे गुन्हेगारांची ओळख पटवून त्यांना अटक करता येईल. सध्या या टोळीचा तपास सुरू आहे.