मुंबई : उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) कानपूर जवळ मंगळवारी रात्री झालेल्या भीषण रस्ता अपघातात 17 जणांचा मृत्यू झाला आहे. खासगी शताब्दी बस आणि प्रवासी लोडर यांच्यात जोरदार टक्कर झाली. या अपघातात 17 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी आहेत. 25 हून अधिक जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. कानपूरचे आयजी मोहीत अग्रवाल यांच्यासह सर्व उच्च अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. मदत आणि बचावकार्य सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री योगी यांनी या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. (Uttar Pradesh : 16 Killed, Around 30 Injured As Bus Collides With Loader in Kanpur)


पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीएम नरेंद्र मोदी म्हणाले, कानपूरमधील रस्ता अपघात अतिशय दु:खादायक आहे. या अपघातात अनेक लोकांचे प्राण गमावले आहेत. मी त्यांच्या कुटुंबीयांबद्दल शोक व्यक्त करतो आणि जखमींच्या आरोग्यात लवकरच सुधारणा व्हावी, असे ट्विट केले आहे.


पंतप्रधानांकडून मदतीची घोषणा  



कानपूरमधील या दुःखद घटनेत प्राण गमावलेल्यांच्या कुटूंबासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत रक्कम जाहीर केली आहे. त्याचबरोबर जखमींना 50,000 रुपयांची मदत दिली जाईल, असे घोषित केले आहे. ही रक्कम पीएमएनआरएफकडून दिली जाईल. पंतप्रधान कार्यालयाने ही माहिती दिली.


मुख्यमंत्री योगी यांचीही आर्थिक मदतीची घोषणा


मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कानपूरमधील भीषण रस्ता अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचण्यासाठी आणि सर्वतोपरी मदत देण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत. जखमींना त्वरित उत्तम वैद्यकीय उपचार देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची भरपाई आणि जखमींवर योग्य उपचारांची व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी अपघाताची चौकशी करण्याचे आदेश दिले असून लवकरात लवकर अहवाल मागविला आहे.


हा अपघात सचेंदीच्या किसन नगर भागात कालव्याजवळ झाला. खासगी शताब्दी बस आणि प्रवासी लोडरमध्ये जोरदार टक्कर झाल्याने हा अपघात झाला. हा अपघात इतकी जोरदार होता की गाड्यांचा चुक्काचूर झाला. यावेळी प्रवाशांच्या किंकाळ्याने अंगावर काटा उभा राहला. तसेच अपघाताच्यावेळी महामार्ग जाम झाला. अपघाताची माहिती मिळताच साचेंदी पोलीस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि स्थानिक लोकांच्या मदतीने नुकसान झालेल्या वाहनांमधून जखमींना बाहेर काढून मदतकार्य सुरू केले.


खासदार देवेंद्रसिंह भोळे, आमदार अभिजित सांगा यांनीही घटनास्थळी पोहोचले. बस चालक आणि कंडक्टर दोघांनीही मद्यप्राशन केले असल्याचे बसमधील प्रवाशांचे म्हणणे आहे. चालक अत्यंत वेगात बस चालवत होता. प्रवाशांनी विरोध केल्यानंतर चालकांने मारहाण करण्याची धमकीही दिली, असे यावेळी काही प्रवाशांनी सांगितले.