महोबा : लग्नात सर्व काही सामान्य होत होते. पण वरमाला घालण्याआधी असे काही घडले की, ते लग्न तुटले. लग्न मोडण्याचे कारण देखील तसे सामान्य म्हणता येणार नाही.  लग्न मोडल्यानंतर दोन्ही बाजूच्या कुटूंबांनी सामंजस्याने प्रश्न सोडवले. एवढेच नव्हे तर नवऱ्या मुलांच्या घरच्यांनी जेवण आणि इतर गोष्टींवर खर्च झालेले चार लाख रुपये देण्याचेही मान्य केले. हे सर्व झालं ते त्या ''बे एक बे''च्या पाढ्यामुळे, किती शक्ती आहे, या अंकांमध्ये हे तुम्हाला समजणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेवटी आयुष्याची सर्वच गणितं चुकली असती, म्हणून या हुशार वधूने वेळीच पाऊल उचललं आणि लग्नात मंगलाष्टकांआधी नवरदेवाला सांगितलं तू ''बे एक बे''चा पाढा आधी म्हण...म्हटला त्याने...कसा म्हटला असेल, हे वधूच्या उत्तराने तुम्हाला समजलं असेलंच.


खरंतर, वरमाला घालण्यापूर्वी अचानक वधूला माहिती मिळाली की, हा नवरदेव अशिक्षित आहे. याची खात्री करण्यासाठी वधूने नवरदेवाला ''बे एक बे''चा पाढा बोलण्यास सांगितले. वधू म्हणाली की, जर तू ''बे एक बे''चा पाढा म्हणू शकला नाहीस, तर मी तुझ्याशी लग्न करणार नाही. त्या नवरदेवाला ''बे एक बे''चा पाढा बोलता आला नाही, ज्यामुळे हे लग्न तुटलं.


नवरदेवाला ''बे एक बे''चा पाढा येत नाही, म्हणून लग्न मोडल्याची एक आश्चर्यकारक घटना घडली आहे. पण यामुळे या वधूच्या जीवनातील सर्वच पुढची गणितं चुकली असती, त्याआधी तिने सर्व काही चुकू न देता बरोबर निर्णय घेतला आहे.


वधूचा लग्नाला नकार


जशी ही बातमी मंडपात उपस्थित असलेल्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचली, तशी सर्वत्र खळबळ उडाली. बरीच समजूत घालून देखील वधूने हे लग्न करायला नकार दिला. यानंतर परिस्थिती हाताबाहेर जात असल्यामुळे पोलिसांना बोलवण्यात आले.


या प्रकरणात पानवाडी पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही कुटूंबात सामंजस्य करार केला. त्यानुसार दोन्ही बाजूच्या कुटूंबीयांनी एकमेकांना दिलेले दागिने आणि पैसे परत केले आणि मुलीचा निर्णय स्वीकारून हे लग्न झाले नाही.


सामंजस्यात असे ठरले होते की, मुलींकडच्यांचा जेवण आणि इतर गोष्टींवर झालेला खर्च मुलाकडचे लोकं परत करतील, त्यामुळे मग मुलाकडच्यांनी मुलीच्या घरच्यांना चार लाख रुपये दिले. त्यांनी एकमेकांना दिलेल्या वस्तूही परत केला. यासह, या घटनेमुळे कोणताही गुन्हा दाखल केला जाणार नाही, हे ही दोन्ही कुटुंबीयांकडून मान्य केले गेल.ही घटना उत्तर प्रदेशच्या महोबा जिल्ह्यातील आहे.