Shocking Crime News: असं म्हणतात की युद्धात आणि प्रेमात सर्व काही माफ असतं. त्याचप्रमाणे प्रेमाला कोणतीही बंधनं नसतात असंही म्हटलं जातं. मात्र प्रत्येक प्रेमकथेचा गोड शेवट होतो असं नाही. अनेकदा घरच्यांचा दबाव किंवा इतर काही कारणामुळे प्रेमी जोडप्यांना वेगळे निर्णय घेऊन आपआपले वेगळे मार्ग निवडावे लागतात. मात्र परिस्थितीनुसार घेतलेले हे निर्णय कायमच खुल्या मनाने स्वीकारले जातातच असं नाही. मनात द्वेष ठेऊन जोडीदाराला धडा शिकवण्याचे अनेक प्रकार समोर येतात. असाच एका धक्कादायक घटनाक्रम उत्तर प्रदेशमधून समोर आला असून हा प्रकार पाहून पोलिसांनाही धक्का बसला आहे.


प्रियकराचं गुप्तांग कापलं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशमधील मुजफ्फरनगरमध्ये एक फारच विचित्र घटना घडली आहे. येथील एका महिलेने तिच्या प्रियकरावर प्राणघातक हल्ला केला आहे. आपल्या प्रियकराने आपल्याला फसवल्याची भावना मनात निर्माण झाल्याने या महिलेने प्रियकराचं गुप्तांग कापल्याचा हादरवून सोडणारा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.


नेमका घटनाक्रम आला समोर


समोर आलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपी महिला आणि गंभीररित्या जखमी झालेल्या पुरुषाचे मागील आठ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र त्यानंतरही या महिलेचा प्रियकर अन्य एका महिलेशी लग्न करण्यास तयार झाला. घरच्यांच्या दबावाखाली प्रियकर आपल्याऐवजी अन्य एका महिलेशी लग्न करण्यास तयार झाल्याचं या महिलेला सहन झालं नाही. तिने तिच्या प्रियकराला मला तुझ्याशी काही बोलायचं आहे, असं सांगून भेटायला बोलावलं. हा तरुण नवीन आयुष्याची सुरुवात करण्याआधी आपल्या प्रेयसीला भेटायला गेला. मात्र आपल्याला फसवून आता आपला जोडीदार दुसऱ्या महिलेशी लग्न करणार आहे हा राग मनात धरुन प्रियकराला भेटलेल्या या महिलेने भेटीमध्ये त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. तिने आपल्या प्रियकराचं गुप्तांग कापलं. आधी या दोघांमध्ये झटापट झाली. त्यामध्ये या महिलेच्या बोटालाही जखम झाली.


या प्रश्नांची उत्तर शोधत आहेत पोलीस


महिलेने या तरुणावर हल्ला केल्यानंतर ताताडीने पोलिसांना याबद्दलची माहिती देण्यात आली. जखमी तरुणाला स्थानिक जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. या प्रकरणामध्ये पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे. या प्रकरणामध्ये पोलीस अधिक तपास करत आहेत. रेल्वे रोडजवळच्या सिव्हील लाइन्स परिसरामध्ये हा संपूर्ण धक्कादायक घटनाक्रम घडल्याची माहिती समोर आली. नेमकं या महिलेनं असं का केलं? तिला यामध्ये इतर कोणी मदत केली का? यासंदर्भातील माहिती सध्या पोलीस घेत आहेत.