Free Ration : सरकारची मोठी घोषणा, मोफत रेशन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी
सरकारकडून अनेक केंद्रांवर ही सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. ज्यामध्ये तुम्ही रेशन कार्ड दाखवून जन सुविधा केंद्रात आयुष्मान कार्डसाठी अर्ज करू शकता.
Free Ration Scheme Update : केंद्र किंवा राज्य सरकारच्या योजनेंतर्गत तुम्हीही मोफत रेशन (Free Ration) घेतले असेल तर आता तुम्हाला मोठा फायदा होणार आहे. याबाबतची माहिती शासनाकडून देण्यात आली आहे. यापुढे अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना (antyodaya ration card) मोफत रेशन तसेच मोफत उपचाराची (Free Health Service) सुविधा मिळणार आहे. सर्व अंत्योदय कार्डधारकांच्या मोफत उपचारासाठी आयुष्मान कार्ड बनवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यासाठी व्यापक मोहीम राबवली जात आहे. (uttar pradesh yogi government give big decision now antyodaya ration card holders will get free ration as well as free treatment facility)
सरकारकडून अनेक केंद्रांवर ही सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. ज्यामध्ये तुम्ही रेशन कार्ड दाखवून जन सुविधा केंद्रात आयुष्मान कार्डसाठी अर्ज करू शकता. योगी सरकारने अंत्योदय कार्डधारकांचे आयुष्मान कार्ड बनवण्याचे आदेश दिल्याचे म्हटलं आहे. जिल्हास्तरावर ही मोहीम राबविण्यात येत आहे.
मोफत उपचार
सरकारच्या या निर्णयानंतर तुम्हाला उपचार घेण्यासाठी अजिबात काळजी करण्याची गरज नाही. यावेळी सरकारकडून नवीन आयुष्मान कार्ड बनवले जात नसून ज्यांची नावे यादीत आहेत त्यांची कार्डं बनवली जात आहेत.
सप्टेंबर महिन्यातही मोफत रेशन
उत्तर प्रदेशमध्ये मोफत रेशन योजनेचा सहावा टप्पा सप्टेंबरमध्ये सुरू झाला आहे. उत्तर प्रदेशमध्ये गरीब कल्याण योजनेचा लाभ घेतलेले 15 कोटी लाभार्थी आहेत, ज्यांना सरकारकडून मोफत रेशन सुविधा दिली जाते.