पौढी गढवाल :  उत्तराखंडमधील पौढी गढवाल येथे एक प्रवासी बस ६० फूट खोल दरीत कोसळून ३० प्रवासी ठार झाल्याची माहिती हाती आलेय. या अपघातात १२  प्रवासी जखमी झाले असून त्यातील चौघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती वर्तविण्यात आली आहे. पोलीस व एसडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली आहे. या बसमधील सर्व प्रवाशी हे देवदर्शनासाठी गेल्याचे सांगण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


उत्तराखंडच्या नैनिडांडा ब्लॉकच्या पिपली-भौन मार्गावरुन ही बस भौन तालुक्यातून रामनगरला जात होती. त्यावेळी धुमकोट येथील एका वळणावर भरधाव वेगात असलेल्या या बसवरीलस चालकाचा ताबा सुटला आणि बस ६० फूट खोल दरीत कोसळली. बस  २८ आसनी असून, रस्त्यावरुन कोसळली. बस दुर्घटनेतील २२ लोकांचे मृतदेह हाती लागले आहेत. दरम्यान, बस दरीत कोसळल्यानंतर एका झाडाला लटकली.  ही घटना काल संध्याकाळी पाच वाजताच्या दरम्यानची आहे.



बस अपघातानंतर घटनास्थळी लोकांची गर्दी जमा झाली. काहींनी या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. तर बसमधील सर्वच प्रवाशांचा जीव धोक्यात होता. मदतीसाठी बसमधील प्रवाशी जोरजोरात ओरडत होते. या दुर्घटनेतून बसमधील ३५ प्रवासी थोडक्यात बचावले आहेत.