कोलकाता महिला डॉक्टर प्रकरणाचे पडसाद संपूर्ण देशभरात पसरले. असं असताना आता उत्तराखंडमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. नर्स तस्लीम जहा हत्याकांडाचा पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणात आरोपीला राजस्थानच्या जोधपुर परिसरातून 14 ऑगस्ट रोजी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी एक कामगार आहे. 


काय आहे प्रकरण? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तराखंडच्या खासगी रुग्णालयात काम करणारी नर्स तस्लीम जहा गेल्या महिन्यात 30 जुलै रोजी हरवली होती. उत्तर प्रदेशातील डिबडिबा क्षेत्रातील तिचा मृतदेह सापडला. ज्यामुळे एकच खळबळ उडाली होती. सांगितलं जातंय की, आरोपी धर्मेंद्र मृत नर्सला झाडीत घेऊन गेला आणि तिच्यावर दुष्कर्म केलं. एवढंच नव्हे तर त्याने तिचा गळा आळवून तिची हत्या केली. यानंतर तिची ओळख पटू नये म्हणून चेहरा दगडाने ठेचला. 


30 जुलै रोजी शेवटचं पाहिलं होतं 


इस्लामनगर, गदरपूर येथील रहिवासी 32 वर्षीय तस्लीम ही नैनितालमधील एका खासगी रुग्णालयात नर्स होती. ती बिलासपूर कॉलनीत तिच्या 11 वर्षाच्या मुलीसोबत राहत होती. 30 जुलै रोजी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या बहिणीने 31 जुलै रोजी रुद्रपूर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत प्रकरणाचा तपास सुरू केला.


सीसीटीव्हीमध्ये दिसली पीडिता


पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे स्कॅन करण्यास सुरुवात केली, त्यादरम्यान ती कॉलनीजवळ शेवटची दिसली. हत्येचा खुलासा करताना एसएसपी डॉ. मंजुनाथ टीसी यांनी सांगितले की, तपासादरम्यान बेपत्ता तस्लीम रुद्रपूर येथील इंद्र चौकातून टेम्पोमधून प्रवास करताना दिसली. यानंतर, यूपी पोलिसांनी बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह झुडपातून बाहेर काढला जो पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांचे पथक तयार करण्यात आले.


याप्रकरणी पोलिसांनी आरोपी धर्मेंद्रला जोधपूर येथून अटक केली आहे. चौकशीत त्याने आपल्याला बसुंधरा अपार्टमेंट, काशीपूर रोड येथे दरोडा टाकण्याच्या उद्देशाने वाटेत पकडल्याचे सांगितले. यानंतर त्यांनी तिला एका झाडीपट्टीत नेऊन तिच्यावर बलात्कार केला आणि तिची गळा आवळून हत्या केली. यासह पर्समध्ये ठेवलेले पैसे व दागिने घेऊन पळ काढला.


काय आहे कोलकाता प्रकरण?


आरजी कार मेडिकल कॉलेजच्या मेडिसिन विभागात पीजीच्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या या प्रशिक्षणार्थीची बलात्कारानंतर निर्घृण हत्या करण्यात आली होती. शुक्रवारी रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळून आला. ती गुरुवारी रात्री ड्युटीवर होती. तिच्या शरीरावर अनेक जखमांच्या खुणा होत्या. शवविच्छेदन अहवालात हत्येपूर्वी बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. काही लोकांचा दावा आहे की, तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला. सध्या उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआय आता या प्रकरणाचा तपास करत आहे. याप्रकरणी आरोपी संजय रॉय याला अटक करण्यात आली आहे.