मुंबई: अनेकवेळा सांगूनही हेल्मेट घालण्याचं नागरिक टाळतात किंवा वाहतुकीच्या नियमांना केराची टोपली दाखवणाऱ्यांसाठी पोलिसांचं भन्नाट ट्वीट व्हायरल होत आहे. या ट्वीटमध्ये वाहतुकीच्या नियमांची तुलना क्रिकेटमधील धावांसोबत केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकताच भारत विरुद्ध इंग्लंड टी 20 पहिला कसोटी सामना झाला. या सामन्यात भारताचा पराभव झाला. पण त्यापलिकडे सर्वात वाईट गोष्ट ही की यावेळी देखील कर्णधार विराट कोहली शून्यावर आऊट झाला आहे. त्यावरून सोशल मीडियावर कर्णधार विराट कोहलीवर अनेक मीम्स आणि टीका देखील होत असतानाच पोलिसांनी जनजागृती करणारं ट्वीट केलं आहे. पोलिसांचं हे ट्वीट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.


पोलिसांनी ट्वीटरमध्ये काय म्हटलं? 
'गाडी चालवताना केवळ डोक्यावर हेल्मेट घालणं पुरेसं नाही तर पूर्ण शुद्धीत राहून नीट गाडी चालवणं गरजेचं असतं. नाहीतर विराट कोहलीसारखं तुम्हीही शून्यावर आऊट होऊ शकता.'



सतत्यानं अपघाताच्या घटना समोर येत असल्यानं पोलिसांनी ही जनजागृती ट्वीटरच्या माध्यमातून केली आहे. विराट कोहली कसोटी मालिकेतील 2 सामन्यांमध्ये शून्यवर आऊट झाला होता. तर भारत विरुद्ध इंग्लंड टी 20 पहिल्या सामन्यात विराटला पुन्हा शून्यावर आऊट व्हावं लागलं. त्यामुळे त्याच्यावर खूप जास्त टीका होत आहे.


विराटनं एकाग्र होऊन बॉल टोलवला नाही त्यामुळे तो जसा शून्यावर आऊट झाला तसंच जर गाडी चालवताना मन एकाग्र नसेल तर अपघात होऊ शकतो असं सूचक वक्तव्य उत्तराखंड पोलिसांनी आपल्या ट्वीटमधून केलं आहे. त्यांचं ट्वीट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.