पोलिसात ७०७ पदे रिक्त ; भरती सुरू
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आणि विशेषतः पोलीसात जाण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
नवी दिल्ली : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आणि विशेषतः पोलीसात जाण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. दिल्ली पोलासात अनेक पदे रिक्त असल्याने भर्ती सुरू केली आहे. ७०७ पदे रिक्त असून यासाठी उमेदवारांची गरज आहे. इच्छुक यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारिख १६ जानेवारी २०१८ आहे.
योग्यता
१० वी पास असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आयटीआय केलेले असल्यास उत्तम.
वयोमर्यादा
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते २७ वर्ष असावे. मात्र ओबीसींसाठी वयोमर्यादेत तीन वर्षांची तर एससी/ एसटी साठी पाच वर्षांची सुट देण्यात आली आहे.
निवड प्रक्रिया
यासाठी लेखी परिक्षा घेण्यात येईल. त्यात ट्रेड टेस्ट देखील घेतली जाईल. निवड झालेल्या उमेदवाराचे वेतन १८,००० ते ५६,००० रूपयांपर्यंत असेल.
आवेदन शुल्क
सामान्य आणि ओबीसी वर्गासाठी १०० रुपये आवेदन आहे. तर महिला, अनुसुचित जाती, जमातींसाठी, माजी सैनिक आणि अपंगांसाठी हे शुल्क घेण्यात येणार नाही. हे शुल्क एसबीआय गेटवे, नेट बॅंकींग आणि कोणत्याही डेबिट कार्डने स्विकारण्यात येईल.
कसा कराल अर्ज?
अर्ज करण्यासाठी www.delhipolice.nic.in या वेबसाईटवर जा. त्यात रिक्रूटमेंट सेक्शन वर क्लिक करा. त्यानंतर ऑनलाईन अप्लीकेशन फॉर्म फार द पोस्ट ऑफ एमटीएस (सिविलियन) इन दिल्ली पोलीस या लिंक वर क्लिक करा. त्यानंतर माहिती काळजीपूर्वक वाचा. तुमची योग्यता तपासा आणि पुढील प्रक्रिया करा.