शाळेच्या विद्यार्थ्यांनी भरलेली बोट नदीत बुडाली; आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू
School Students Boat Drown: बोट उलटल्याच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटद्वारे सहवेदना व्यक्त केली आहे.
School Students Boat Drown: गुजरातच्या वडोदरामधून एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. येथील हरणी जिल्ह्यात एक बोट पलटली आहे. ही बोट पलटल्याने 14 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये 12 विद्यार्थी आणि 2 शिक्षकांचा समावेश आहे. या बोटीमध्ये खासगी शाळेचे एकूण 27 विद्यार्थी होते.या विद्यार्थ्यांनी कोणतेही लाईफ जॅकेट परिधान केलेले नसतानाही त्यांना या बोटीत बसविण्यात आले होते. दरम्यान फायर ब्रिगेडची टीम बुडालेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेत आहे.
मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या सहवेदना
बोट उलटल्याच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटद्वारे सहवेदना व्यक्त केली आहे. वडोदऱ्याच्या हरणी जिल्ह्यात बोट पलटून मुले बुडाल्याची घटना घडली आहे. ही अत्यंत हृदय विदारक घटना आहे. प्राण गेलेल्या विद्यार्थ्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी मी प्रार्थना करत आहे. या दु:खद प्रसंगी मी त्यांच्या परिवाराच्याप्रति सहवेदना व्यक्त करत आहे. ईश्वर त्यांना हे दु:ख सहन करण्याची ताकद देवो, असे मुख्यमंत्री म्हणाले.
घटनास्थळी बोटीत बसलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांच्या बचावाचे कार्य सुरु आहे. तसेच जखमी झालेल्यांना तात्काळ उपचारासाठी नेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.