नवी दिल्ली : अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांच्या कार्यकाळातच पोखरण परिक्षण झालं होतं. या परिक्षणानंतर पाकिस्तान पासून अमेरिकेपर्यंत सगळ्यांनाच धक्का बसला होता. हे परिक्षण रोखण्यासाठी अमेरिकेने भारतावर नजर ठेवली होती. पण कोणालाही काहीही न कळता हे परिक्षण यशस्वी करण्यात आलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशात या दरम्यान राजकारण देखील झालं. या मुद्द्यावर वाजपेयींना घेरण्याचा देखील विरोधकांनी प्रयत्न केला होता. पोखरण परिक्षणावर विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. देशाला या परिक्षणाची गरजच काय असा सवाल विरोधकांनी केला होता. तेव्हा यावर उत्तर देतांना अटल बिहारी वाजपेयी यांनी असं काही म्हटलं की विरोधकांची बोलती बंद झाली.


पाहा तो व्हिडिओ