180 kmph चा वेगात धावली वंदे भारत स्लीपर, तरीही पाण्याचा एक थेंबही खाली पडला नाही, अचंबित करणारा Video
Vande Bharat Train Sleeper: वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. रेल्वे मंत्र्यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे.
Vande Bharat Train Sleeper: भारताची प्रिमियम ट्रेन म्हणून ओळखली जाणारे वंदे भारत आता लवकरच नव्या रुपात धावण्यास सज्ज झाली आहे. वंदे भारतच्या यशानंतर भारतीय रेल्वेने वंदे भारत स्लीपर ट्रेनची घोषणा केली होती. वंदे भारत स्लीपर ट्रेनचे पहिले मॉडल या महिन्याच्या अखेरपर्यंत लाँच होण्याची शक्यता आहे. नवीन वर्षांत प्रवाशांना गिफ्ट मिळणार आहे.
वंदे भारत एक्स्प्रेस सुपरफास्ट असल्याने कमी वेळात जास्त अंतर गाठते. त्यामुळं लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी वंदे भारतने प्रवास करणे सोयीचे ठरते. मात्र ट्रेनमध्ये फक्त केबल चेअर बसल्याने फक्त बसूनच प्रवास करावा लागतो. सहा ते सात तासांच्या प्रवासात बसून बसून पाय दुखणे किंवा पाठदुखी होत असल्याची तक्रार प्रवाशांकडून करण्यात येत होती. त्यामुळं रेल्वेने वंदे भारत स्लीपर एक्सप्रेसची घोषणा केली होती. या ट्रेनमुळं लांब पल्ल्यांचा प्रवास अधिक आरामदायी आणि जलद होणार आहे. वंदे भारत स्लीपरचा चाचणी अंतिम टप्प्यात आहे.
वंदे भारत स्लीपर ट्रेन आता स्लीपर बर्थच्या रुपात येणार आहे. या बदलामुळं प्रवाशांना आता प्रवास करणे अधिक सोयीचे होणार आहे. त्या व्यतिरिक्त लांब पल्ल्याचा प्रवास करताना कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही. वंदे भारत स्लीपर ट्रेनची चाचणी अंतिम टप्प्यात असून चाचणी दरम्यान तब्बल 180 Kmph वेगाने वंदे भारत धावली. याचा व्हिडिओ रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शेअर केला आहे.
रेल्वे मंत्र्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत दिसत आहे की, ट्रेन 180 प्रतितास वेगाने धावत आहे. तर, ट्रेनच्या खिडकीजवळ एक पाण्याने भरलेला ग्लास ठेवला आहे. मात्र ट्रेन इतक्या वेगात धावत असूनदेखील पाण्याचा एक थेंबही खाली सांडत नाहीये. यावरुन तुम्ही आंदाज बांधू शकता की इतर ट्रेनच्या तुलनेत वंदे भारत एक्स्प्रेसचा प्रवास अधिक आरामशीर होणार आहे.
वंदे भारत एक्स्प्रेस सेवेत दाखल करण्यापूर्वी याची सुरक्षिततेच्या दृष्टीने याच्या चाचण्या करण्यात येत आहेत. रिसर्च डिझाइन अँड स्टँडर्डस (आरडीएसओ)सोबत चाचणी करण्यात येत आहे. दरम्यान एका रिपोर्टनुसार, वंदे भारत स्लीपर ट्रेन असल्याकारणामुळं त्याच्या वेगावर मर्यादा येऊ शकतात. पहिले वंदे भारतचा वेग 130-180 किमी प्रतितासपर्यंत पोहोचण्याची शक्यता होती. मात्र आता 130 प्रतितास वेगाने धावण्याचा अंदाज आहे. परंबूर इंटीग्रल कोच फॅक्ट्री (आयसीएफ)च्या अधिकाऱ्यांनुसार नवीन डिजाइन आणि अतिरिक्त वजनामुळं ट्रेनची गती कमी होऊ शकते.