भारताची पहिली सेमी हायस्पीड ट्रेन वंदे भारत (Vande Bharat) आता लवकरच नव्या रंगात दिसणार आहे. सध्या देशात धावणाऱ्या वंदे भारत ट्रेन सफेद आणि निळ्या रंगात आहेत. पण आता तिच्या रंगात बदल करण्यात आला आहे. रेल्वेच्या चेन्नईतील इंटीग्रल कोच फॅक्टरीत (ICF) निर्मिती होत असलेल्या 8 डब्यांची वंदे भारत आता भगव्या आणि राखाडी रंगात दिसणार आहे. याशिवाय ट्रेनवर लावण्यात आलेल्या चित्त्याच्या लोगोतही बदल करण्यात आला आहे. तसंच वंदे भारतच्या फिचर्समध्ये 25 बदल करण्यात आले आहेत. भगव्या रंगातील या वंदे भारतचं ट्रायल रन झालं असून, आता ती सेवेत कधी दाखल करायची याचा निर्णय होणार आहे. भविष्यात सर्व वंदे भारत याच रंगात असतील असं बोललं जात आहे. 


आधीपेक्षा आरामशीर आसनं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वंदे भारतमध्ये रंगांव्यतिरिक्त अनेक फिचर्समध्येही बदल करण्यात आले आहेत. सीट्स आधीपेक्षा आरामदायक आणि मऊ करण्यात आल्या आहेत. वॉश वेसिनची उंचीही वाढवण्यात आली आहे. सीटचं रिक्लायनिग अँगल वाढवण्यात आला आहे. चार्जिग पॉईंटही व्यवस्थित करण्यात आला आहे. एक्झिक्युटिव्ह डब्यात सीटचा रंग लालऐवजी निळा करण्यात आला आहे. ड्रायव्हिंग ट्रेलर कोचमध्ये व्हि़लचेअरसाठी सेक्युरिंग पॉईंट देण्यात आला आहे. शौचालयात लाईट 1.5 च्या जागी 2.5 व्हॉल्टची बसवण्यात आली आहे. 



याशिवाय पडदे अधिक मजबूत आणि कमी पारदर्शक करण्यात आले आहेत. टॅपमधील पाण्याचा प्रवाहही चांगला करण्यात आला आहे.  एक्झिक्युटिव्ह चेअरकारच्या शेवटच्या सीटपर्यंत मॅगझिन बॅग्स देण्यात आल्या आहेत. टॉयलेट हँडल्स लवचिक करण्यात आले आहेत. ट्रेनच्या रंगाप्रमाणे टॉयलेट पॅनलचा रंगही बदलण्यात आला आहे. इमर्जन्सीसाठी हॅमर बॉक्स कव्हरला अजून चांगलं बनवण्यात आलं आहे. इमर्जन्सी टॉकबॅक युनिटला बॉर्डरलेस करण्यात आलं आहे आणि रंग पॅनल कलरशी मॅच करण्यात आला आहे. एअरसोल फायर डिटेक्शन आणि सप्रेशन सिस्टम बसवण्यात आलं आहे. 


वंदे भारतमध्ये एकूण 25 बदल


तसंच चांगल्या एसीसाठी एअर टाइटनेस वाढवण्यात आला आहे. एफआरपी पॅनलला मॉडिफाइड पॅनल लावण्यात आले आहेत. ड्रायव्हरच्या डेस्क युनिफॉर्मचा रंगही बदलण्यात आला आहे. अप ट्रिम पॅनेलही चांगलं करण्यात आलं आहे. ड्रायव्हरच्या कंट्रोल पॅनलमध्ये इमर्जन्सी स्टॉप पूश बटला इंटरजेंज करण्यात आलं आहे. फायर एक्सटिंग्विशरसाठी पारदर्शक दरवाजा ठेवण्यात आला आहे, जेणेकरुन ते सहज दिसून येईल. वंदे भारतमध्ये एकूण 25 नवे बदल करण्यात आले आहेत.