`ती` मला मुलीसारखी, सुभाष बरालांनी अखेर मौन सोडलं
एका २९ वर्षीय तरूणीशी भाजप नेत्याच्या मुलानं आणि त्याच्या मित्रानं गैरवर्तन केल्याचं प्रकरण सध्या चंदिगडमध्ये गाजतंय.
चंदिगड : एका २९ वर्षीय तरूणीशी भाजप नेत्याच्या मुलानं आणि त्याच्या मित्रानं गैरवर्तन केल्याचं प्रकरण सध्या चंदिगडमध्ये गाजतंय. याप्रकरणी हरयाणाचे भाजप प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांनी मंगळवारी प्रथमच मौन सोडलं.
पीडित तरूणी मला मुलीसारखी आहे, असं सांगतानाच याप्रकरणी कायद्यानुसार योग्य ती कारवाई होईल. आपण पोलिसांवर कोणताही दबाव आणणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिलीय.
ज्येष्ठ आयएएस अधिका-याची मुलगी असलेल्या या तरूणीचा विकास बराला आणि त्याचा मित्र आशिष या दोघांनी पाठलाग करून तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी दोघांना अटक करून त्यांची जामिनावर सुटका करण्यात आलीय. या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून बरालांनी भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांनी केलीय.