Vastu Tips for Valentine Day: सध्या व्हेलंटाईन वीक सुरू आहे त्यामुळे प्रेमी युगुल आपल्या प्रियकर-प्रेयसीला भेट म्हणून देण्यासाठी महागडे आणि आकर्षक गिफ्ट्स (Gifts for Valentine Day) देण्याच्या प्रयत्नात असतील. त्यामुळे तुम्हीही अनेक पर्यांयांचा विचार करतच असाल परंतु थांबा... असेही काही गिफ्ट्स आहेत ते देणं तुम्हाला चांगलंच महागात पडू शकेल. आपण आपल्या प्रियकराला किंवा प्रेयसीला काहीतरी चांगलं गिफ्ट देण्याच्या प्रयत्नात असतो त्यामुळे आपल्यालाही अनेकदा समजतं नाही की आपल्या पार्टनरला (Partner) असं काय आवडेल ज्यानं आपला पार्टनर कायमच खूश राहिल. परंतु या काही टीप्स तुम्हाला लक्षात घ्याव्या लागतील ज्यामुळे तुमच्या व्हेलन्टाईट डेच्या दिवशी काहीच अडथळे येणार नाहीत. खासकरून व्हेलन्टाईट डेला आणि गिफ्ट डेच्या दिवशी असे गिफ्ट्स अजिबातच देऊ नका. (Vastu tips for valentines day 2023 do not gift these things to your lover or partner It may ruin your relationship)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वास्तुशास्त्रानुसार (Vastu Tips) काही वस्तू या तुम्ही व्हेलनटाईटनं डेला आपल्या प्रियकाराला किंवा प्रेयसीला देऊ शकत नाही. त्याचबरोबर जरा का यातील एकही वस्तू तुम्ही आपल्या पार्टनरला दिलीत तर तुमच्यासाठी ते अशुभ ठरू शकतात. वर्षातून एकदाच येणारा व्हेलनटाईन डे हा आपल्यासाठी फारच खास असतो. आपल्याला आपल्या प्रियजनांना खूश करण्यासाठी नेहमीच आधीपेक्षा आणि खासकरून मागच्या वर्षीपेक्षा काहीतरी हटके देण्याच्या प्रयत्नात असतो. त्यामुळे बाजारात गिफ्ट्ससाठी एकच झुंबड लागलेली असते. 


जाणून घ्या वास्तूशास्त्र काय सांगत? 


अनेकदा कपल्स हे एकमेकांना रूमालही गिफ्ट करतात परंतु असं करणं आणि खासकरून रूमाल गिफ्टमधून एक्सचेंज करणं हे अशुभ मानले जाते. त्यामुळे गिफ्ट म्हणून डिझानयरच काय कुठल्याही रंगाचे रूमाल गिफ्ट म्हणून देऊ नका. 


आपल्या पार्टनरला गिफ्ट म्हणून चुकूनही शूज किंवा चपला देऊ नका. त्यानं तुमच्या नात्यात अनेक अडथळे येऊ शकतात. यातून तुमच्या नात्यात नकारात्मकता येते आणि त्याचा त्रास तुमच्या रिलेशनशिपवरती होऊ शकतो आणि सोबत तुमच्या नात्यात दुरावाही येऊ शकतो. 


वास्तूशास्त्रानुसार, तुम्ही कोणत्याही प्रकारे आपल्या पार्टनरला काळ्या रंगाचे गिफ्ट देऊ नका. कारण काळा रंग हा अशुभ मानला जातो. त्यातून जर का त्याची आवडती वस्तू तुम्ही काळ्या रंगाची दिलीत तर ते तुमच्यासाठी अशुभ ठरू शकते. 


आपल्या पार्टनरला बुडत्या जहाजाची प्रतिमा आपल्या पार्टनरला गिफ्ट म्हणून कधीही देऊ नका. यानं तुमच्या नात्यात मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर या प्रतिमेनं नकारात्मक संकेत येतात तेव्हा तुमच्या आयुष्यात तुम्हाला आर्थिक समस्यांचाही सामना करावा लागणार आहे.