मुंबई : महागाईने सर्वसामान्यांच्या महिन्याचा हिशेब कोलमडून पडला आहे. एकीकडे वाढणारे इंधनाचे दर आणि दुसरीकडे किराणा सामानाच्या किंमतही लक्षणीय वाढ  होताना दिसून येत आहे. प्रामुख्याने खाद्यतेलाच्या किंमतीत झालेली लक्षणीय वाढ सामान्यांचा खिसा कापणारी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाज्या- डाळींसह जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे स्वयंपाकघरालाही महागाईची झळ बसलीये. गृहिणींच्या हाऊस बजेटवर याचा मोठा परिणाम होताना दिसत आहे.


खाद्यतेलाच्या (Food Oil) विशेषत: सूर्यफूल तेलाच्या किमतीत वर्षभरात 60 टक्कयांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. गेल्यावर्षी मार्च महिन्यात 107 रुपयांना मिळणारे सूर्यफुलाचे तेल आता 172 रुपयांना झाले आहे. याशिवाय दुधाचे दरही 6 टक्क्यांनी वाढले असून गतवर्षी 46 रुपये लिटरने मिळणारे दूध आता 49 रुपये लीटरने मिळत आहे.


 मध्यंतरी 200 रुपयांपर्यंत पोहोचलेले खाद्यतेल आता 160 ते 170 रुपये लीटर दरावर स्थिरावले आहे. शेंगदाणा तेलाचे दर गतवर्षी 140 रुपये प्रतिलिटर असताना आता तो दर 179 वर पोचला आहे. वर्षभरात 28.1 टक्के दराने वाढ नोंदली गेली आहे.