नवी दिल्ली :  संसदेच्या पावसाळी अधिवेशनात  (Parliament Monsoon Session) राज्यसभेत (Rajya Sabha) मंगळवारी पेगॅसस आणि कृषी कायद्यांवरुन विरोधकांनी जोरदार गदारोळ घातला. दरम्यान, काही विरोधी खासदारांनी टेबलावर चढून गोंधळ घातला. याप्रकारानंतर राज्यसभेचे सभापती सभापती व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu) भावूक झाले. 


नायडू यांनी व्यक्त केली तीव्र नाराजी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यसभेत विरोधकांकडून घालण्यात आलेल्या गदारोळामुळे सभापती व्यंकय्या नायडू यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विरोधकांच्या गदारोळामुळे आपण रात्रभर झोपू शकलो नाही, असे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले होते. राज्यसभेत मंगळवारी पेगॅसस आणि कृषी कायद्यांवरुन विरोधकांनी गदारोळ घातला. विरोधी पक्षातील काही खासदार वेलमध्ये जाऊन टेबलावर चढले आणि आसनाच्या दिशेने पुस्तके फेकली. यावेळी जय जवान जय किसानच्या घोषणा देत कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करण्यात आली. या गोंधळानंतर राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले होते.


विरोधी खासदारांचा गोंधळ, होऊ शकते मोठी कारवाई


राज्यसभेत घालण्यात आलेल्या गोंधळाबाबत बोलताना भावूक झालेल्या व्यंकय्या नायडू यांनी सांगितले, मी काल जेव्हा काही सदस्य बाकावर बसले आणि काहीजण वरती चढले तेव्हा या सभागृहाचा अवमान झाला. तसेच सभागृहाचे पावित्र्य नष्ट करण्यात आले. विरोधकांच्या या गोंधळामुळे आपण रात्रभर झोपू शकलो नाही.



राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu) यांनी गोंधळ घालणाऱ्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राज्यसभेत विरोधी खासदारांकडून पुस्तक फेकणे योग्य नाही. पुस्तक अध्यक्षांच्या खुर्चीच्या दिशेने फेकणाऱ्या विरोधी खासदारांवर सभापती व्यंकय्या नायडू कारवाई करू शकतात. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, सभागृह नेते पीयूष गोयल आणि इतर भाजप खासदारांनी आज सकाळी व्यंकय्या नायडू यांची भेट घेतली आणि याबाबत चर्चा केली.