नवी दिल्ली : या संदर्भातली अखेरची सुनावणी कोर्टात 26 एप्रिल रोजीच झाली आहे.


2 जी स्पेक्ट्रम घोटाळा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माजी दूरसंचार मंत्री ए राजा आणि राज्यसभा खासदार कनीमोझी यांच्यावर पटीयाला हाऊस कोर्टात 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्या प्रकरणी खटला सुरू आहे. या खटल्याचा निकाल 21 डिसेंबर रोजी देण्यात येणार आहे. या प्रकरणी सीबीआय आणि सक्तवसूली संचालनालय या दोघांनी खटले भरले आहेत.


न्यायव्यवस्थेवर विश्वास


राजांना या खटल्याच्या निकालाबद्दल विचारलं असता, मी न्यायाधीश नाही, मी एक कायदा पाळणारा नागरीक असून माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, असं ते म्हणाले.


200 कोटींची लाच


सीबीआयच्या तपासानुसार 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात 200 कोटी रुपये डिबी गृपकडून कलाईग्नार टिव्ही ला देण्यात आले. या पैशांचा लाभ ए राजा, कनीमोझी आणि करुणानिधींची बायको दयालू अम्मल यांनी घेतल्याचा आरोप आहे. सध्या राजा जामिनावर बाहेर आहेत.