COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बंगळुरू : जाको राखे साईया मार सके ना कोय,  या म्हणीची उक्ती बंगळुरूत आली.नेलमंगला भागात महामार्गावर एका दुचाकीच्या विचित्र अपघातात ५ वर्षांचं लहान मुल आश्चर्यकारकरित्या वाचलं. 


चेन्नपरमेश्वर आणि त्याची पत्नी रेणूका हे त्यांच्या पाच वर्षांच्या मुलासह महामार्गावरून चालले होते. त्याचवेळी त्यांची दुचाकी दुसऱ्या एका दुचाकीला मागून धडकली. यावेळी दुचाकीवरून चेन्नपरमेश्वर आणि त्यांची पत्नी दोघेही खाली पडले. 


पण बाईक तशीच चालकाविना रस्त्यावरून पळत राहिली. तब्बल ३०० मीटर ही दुचाकी महामार्गावरून जात राहिली... गंभीर बाब म्हणजे यावेळी अवघ्या पाच वर्षांचं मुलं त्या दुचाकीवर होतं. ३०० मीटर चालकाविना दुचाकी गेल्यावर दुचाकी कोसळली.


मात्र दुचाकीवरचं मुल डिव्हाडरवर लावलेल्या हिरवळीत कोसळलं. या मुलाला अजिबात इजा झाली नाही. तर चेन्नपरमेश्वर आणि त्यांच्या पत्नीला मात्र किरकोळ जखमा झाल्या आहेत. एका पोलिसाने हा व्हीडीओ ट्वीटरवर पोस्ट केलाय. त्यानंतर हा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.