सभागृहात नाही बोलले मोदी मग माफी का मागावी - वेंकैया नायडू
संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांना जोरदार गोंधळ घातला. ज्यामुळे राज्यसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं.
नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांना जोरदार गोंधळ घातला. ज्यामुळे राज्यसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं.
राज्यसभा आणि लोकसभेमध्ये काँग्रेस खासदार हे पंतप्रधान मोदी यांनी माफी मागावी या मागणीवर ठाम आहेत. पंतप्रधान मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर गुजरात निवडणुकीमध्ये केलेल्या वक्तव्याबाबत माफी मागण्याची मागणी काँग्रे करत आहे.
बुधवारी सकाळी संसदेचं कामकाज सुरु होताच काँग्रेस नेत्यांनी पंतप्रधान मोदींनी माफी मागावी म्हणून काँग्रेस नेते सभागृहात घोषणाबाजी करत होते. सभापती वेंकैया नायडू यांनी म्हटलं की, पंतप्रधान मोदी यांनी ते वक्तव्य सदनमध्ये नाही केलं म्हणून सभागृहात माफीची मागणी करणे चुकीचे आहे. मंगळवारी देखील याच विषयावर काँग्रेसने गोंधळ घातला होता.